Nayanthara SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nayanthara : दाक्षिणात्य अभिनेत्रीनं सीतेच्या भूमिकेसाठी केला मोठा त्याग; सोडलं नॉनव्हेज, कारण काय?

Nnayanthara Quit Non Veg: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने 'श्री रामा राज्यम' या चित्रपटासाठी नॉनव्हेज सोडलं. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टी गाजवणारी नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा (Nayanthara ) होय. सध्या ही साऊथची सुपरस्टार 'बियॉन्ड द फेयरीटेल' डॉक्युमेण्ट्रीमुळे चर्चेत आहे. ही डॉक्युमेण्ट्री ओटीटीवर पाहता येणार आहे.

अभिनेत्री नयनताराने साऊथसोबतच हिंदी सिनेमाही गाजवला आहे. २०११ मध्ये 'श्री रामा राज्यम' नावाचा चित्रपट अभिनेत्री नयनताराने केला होता. या चित्रपटासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटादरम्यान एक किस्सा 'बियॉन्ड द फेयरीटेल' डॉक्युमेण्ट्रीमधील तिच्या टिम मेंबरने सांगितला आहे. त्यांने या चित्रपटासाठी नयनताराने मांसाहार सोडल्याचा खुलासा केला आहे. 'श्री रामा राज्यम' या चित्रपटात तिने माता सीतेची भूमिका साकारली होती. त्याने सांगितले की, 'श्री रामा राज्यम' चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी नयनताराने नॉनव्हेज खाणं सोडलं होते. सीतेच्या भूमिकेचे पावित्र्य जपण्यासाठी नयनताराने अस केलं होत.

शूटिंग दरम्यान नयनतारा हॉटेल ताज कृष्णामध्ये राहत होती. तिने शूटिंग दरम्यान नॉनव्हेज सोबतच हॉटेलचं पाणीही पिणे सोडलं होत. तिच्यासाठी शुद्ध शाकाहारी जेवण बाहेरून मागवलं जात होत. नयनतारा कोणत्याला भूमिकेत स्वतःला झोकून देऊन काम करते. चित्रपटासाठी नयनताराने अनेक नियम लावून घेतलं होते. नयनतारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध फोटोशूटचे फोटो आणि नवीन प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या फोटोंमधील अदांनी ती कायमच प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. 'जवान' चित्रपटात किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान सोबत तिने दमदार अभिनय केला आहे. तिचा 'जवान' हा चित्रपट खूप हिट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT