Yash Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

'...म्हणून मी वाढदिवस साजरा करत नाही', KGF स्टार यशने मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत व्यक्त केलं दु:ख

Yash Meets Families Of 3 Fans Who Died: यशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना विजेचा धक्का लागून त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते.

Priya More

KGF star Yash birthday:

साऊथ सुपरस्टार यशचा सोमवारी ३८ वा वाढदिस (Yash Birthday) होता. पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. यशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना विजेचा धक्का लागून त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते. चाहत्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच यश खूपच चिंतेत आला. वाढदिवस साजरा न करताच तो आपल्या मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमी चाहत्यांना भेटण्यासाठी गेला. जखमी चाहत्यांची भेट घेतल्याचे यशचे हे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.

चाहत्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची बातमी कळताच यश तात्काळ मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी कर्नाटकातील हुबळी येथे पोहचला. एएनआय वृत्तसंस्थेने यशचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यश त्याच्या जखमी चाहत्यांना आणि मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांना भेटत आहे. रुग्णलयामध्ये जाऊन त्याने जखमी चाहत्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यश घटनास्थळावर पोहचताच चाहत्यांनी त्याच्या कारला घेराव घातला.

यशने मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला आणि त्यांचे सांत्वन केले. मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत यशने माध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, 'अशी भयानक घटना घडेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती जबाबदार असणे आवश्यक आहे.' तसंच, 'याच कारणासाठी मी वाढदिवस साजरा करत नाही.', असा खुलासा यशने केला आहे.

दरम्यान, यशच्या वाढदिवसाची तयारी करताना सोमवारी मोठी दुर्घटना घडली होती. यशचा कट-आउट लावताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात घडली होती. या घटनेत हणमंता हरिजन(21 वर्ष), मुरली नदविनमणी (20 वर्ष) आणि नवीन गाझी (19 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लक्ष्मेश्वर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

SCROLL FOR NEXT