Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2: टाळ्या अन् शिट्ट्यांचा जल्लोष; प्रीमियरच्या चेंगराचेंगरीत एका फॅनचा मृत्यू तर चिमुकली गंभीर जखमी

Allu Arjun- Rashmika Mandanna: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाने प्रेक्षकांसोबत थिएटरमध्ये बसून 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. त्या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट पाहण्यासाठी लोक खूप उत्साह दाखवत आहेत. 'पुष्पा 2' आज (5 डिसेंबर)ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर हैदराबाद पार पडला. या प्रीमियर शोला अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) उपस्थित राहिले. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटर बाहेर गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर एका महिला फॅनचाही मृत्यू देखील झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' प्रीमियरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक मुल बेशुद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न पोलीसांकडून होत आहेत.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी संध्या थिएटरमध्ये प्रेक्षकांसोबत बसून हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. त्यामुळे येथे मोठी गर्दी पाहायला मिळाली. जेव्हा अल्लू अर्जुनची कार थिएटर बाहेर पोहचताच टाळ्या अन् शिट्ट्यांचा जल्लोष होऊ लागला. तसेच त्याला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होऊ लागली.

मीडिया रिपोर्टनुसार, गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यात देखील अनेक जण जखमी झाले. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे झाले होते. हा शो पहाटे 3 वाजताचा होता.

2021 मध्ये 'पुष्पा द राईज' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'पुष्पा 2' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच छप्पर फाड कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT