मनोरंजन बातम्या

Sonu Nigam : सोनू निगमच्या शोमधून निघून गेले राजस्थानचे मुख्यमंत्री, म्हणाला जर तुम्ही थांबू शकत नसाल तर येऊ नका !

Sonu Nigam : सोनू परफॉर्म करत असताना राजस्थानचे मुख्यमंत्री निघून गेल्यामुळे सोनू निगमने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करुन व्यक्त केली नाराजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sonu Nigam : गायक सोनू निगम अलीकडेच राजस्थानमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये झाला. मात्र तेथील राजकारण्यांच्या वागणुकीनंतर सोनुने नाराजी व्यक्त केली आहे. गायक सोनू निगमला 'रायझिंग राजस्थान'मध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलावण्यात आले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक बडे नेते आणि परदेशी प्रतिनिधी या शोमध्ये सहभागी झाले होते. पण सोनू परफॉर्म करत असताना सीएम शर्मा आणि सर्व नेते उठून निघून गेले. त्यामुळे सोनू निगमने यासंदर्भात एक व्हिडिओ द्वारे नाराजी व्यक्त करत जर तुम्ही थांबू शकत नसाल तर येऊ नका असा थेट संदेश दिला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू निगम म्हणतो, “सध्या मी एका जयपूरमध्ये एक कॉन्सर्टकरून येत आहे. या कॉन्सर्टसाठी अनेक चांगले लोक आले होते. राजस्थानची शान वाढवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधी आले होते. राज्यस्थानचे सीएम (भजनलाल शर्मा), क्रीडामंत्री देखील तिथे उपस्थित होते. खूप लोक होते. मला अंधारात सगळे दिसत नव्हते. बरेच लोक होते. कार्यक्रमाच्या मध्यभागी, मी पाहिले की सीएम साहब आणि इतर सर्व लोक उठून निघून गेले. ते निघून गेल्यावर तिथे असलेले सर्व प्रतिनिधीही निघून गेले.”

राजकारण्यांना सोनू निगमचे आवाहन

राजकारण्यांना विनंती करताना सोनू निगम म्हणाले की, “मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर करत नसाल तर बाहेरचे लोक काय करतील. ते काय विचार करत असतील? मी कधीही अमेरिकेत कोणाला परफॉर्म करताना पाहिले नाही आणि तिथले राष्ट्राध्यक्ष उठून निघून जातात. म्हटल्यावर तो जाईल, कदाचित नाही जाणार. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, जर तुम्हाला उठून निघून जावे लागणार असेल तर शो सुरू होण्यापूर्वी येऊ नका आणि निघू नका.

"हा सरस्वतीचा अपमान आहे."

सोनू पुढे म्हणाला की, “कोणत्याही कलाकाराच्या परफॉर्मन्सच्या मध्येच उठून निघून जाणे अनादर आहे. हा सरस्वतीचा अपमान आहे. कारण हे माझ्या लक्षात आले नाही. तुम्ही गेल्यावर मला सगळ्यांचे मेसेज आले की असे शो करू नका. तुम्ही राजकारण्यांसाठी कार्यक्रम करू नका कारण ते उठले आणि निघून गेले तर कलेचा आदर होत नाही.

आपली नाराजी व्यक्त करताना सोनू म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, जर तुम्हाला जायचेच असेल तर परफॉर्मन्सपूर्वी जा. अजिबात बसू नका. मला माहित आहे की तुम्ही व्यस्त आहात. तुम्ही लोक महान आहात. तुमच्याकडे खूप काम आहे. तुम्ही सर्व जबाबदाऱ्या सांभाळता, त्यामुळे शोमध्ये बसून तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यामुळे तुम्ही आधीच जावे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT