मनोरंजन बातम्या

Sooraj Pancholi's Post: जिया खान प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

Sooraj Pancholi's Instagram Story: सूरजने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

Pooja Dange

Sooraj Pancholi's First Reaction After CBI Court Acquits Him: अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. जिया खानने ३ जून, २०१३ ला आत्महत्या केली होती. तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला या प्रकरणात आरोपी ठरविण्यात आले होते. पण या प्रकरणाचा निकाल सूरजच्या बाजूने लागलं आहे. निकाल लागताच सूरजने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर सूरज पांचोलीने त्याची पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. सूरजने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

त्याने या स्टोरीमध्ये मोकळ्या आकाशाचा फोटोत शेअर करत त्यावर 'द ट्रुथ ऑलवेज विन्स!' (सत्याचा नेहमी विजय होतो!) असे लिहिले आहे. तर नमस्कार आणि हृदयाचे चिन्ह शेअर केले आहे आणि त्याखाली 'गोड इज ग्रेट' असे लिहिले आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाने सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी या प्रकरणावर निकाल देत म्हटले आहे की, पुराव्याच्या कमतरतेमुळे हे न्यायालय तुम्हाला (सूरज पांचोली) दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जिया खान आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सीबीआयच्या या निर्णयावर अभिनेत्री जिया खानची आई समाधानी नसल्याने तिने ती उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तिने सांगितले आहे.

जियाच्या आईने सीबीआय कोर्टाला दिलेल्या एक निवेदन केले होते म्हटले होता की, पोलीस आणि सीबीआय या दोघांनी सूरज आरोपी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत. (Latest Entertainment News)

Sooraj Pancholi's first reaction on Instagram Story After CBI Court Acquits him

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून, २०१३ ला स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले होते. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानांचे सुसाईड नोट सापडले होते. जे जिया खानने लिहिले असल्याचे सांगण्यात आले होते. त्या नोट नुसार जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा १० वर्षांनी निकाल लागला आहे. या प्रकरणात जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरावे नसल्याने न्यायालयाने हा निकाल दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT