Scam 2003 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Scam 2003 Teaser: ‘Scam 1992’ नंतर हर्षद मेहता घेऊन येतोय नवा ‘घोटाळा’, दमदार टीझर पाहिला का?

Scam 2003 Teaser Shared: ‘स्कॅम १९९२’ नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज येणार आहे.

Chetan Bodke

Scam 2003 Teaser Shared On Social Media: ‘रिस्क हैं तो इश्क हैं!’ हा डायलॉग तुम्ही ‘स्कॅम १९९२’ या वेबसीरिजमधला ऐकलाच असेल. सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहताच्या भूमिकेत प्रतिक गांधी होता. या वेबसीरिजचे कथानक हर्षद मेहताने जो घोटाळा केला होता. त्यावर ‘स्कॅम १९९२’ (Scam 1992) ही वेबसीरिज आधारीत होती.


वेबसीरिजची २०२० मध्ये क्रेझ चांगलीच होती. अशातच ‘स्कॅम १९९२’ नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज येणार आहे. यामध्ये देखील प्रमुख भूमिकेत प्रतीक गांधीच दिसणार आहे. या सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा उघडकीस येणार आहे.

'स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी' चा टीझर आज म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना पत्रकार संजय सिंह यांच्या 'रिपोर्टर्स डायरी' या हिंदी पुस्तकातून घेण्यात आली आहे.

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये २००३ मधील मुंबईतील एक घटना दाखवली आहे. स्कॅम २००३ च्या टीझरमध्ये दिसतंय की, २००३चा हा घोटाळा इतका मोठा होता की “गणितज्ञों के देश में शून्य कम पड गये” (गणितज्ञांसाठी शून्यांची कमतरता होती). त्या टीझरमध्ये २००३ चा ३०,००० कोटींचा घोटाळा उघडकीस आणतो. (OTT)

टीझरमध्ये पुढे, अब्दुल करीम तेलगीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसतो. नेमका या वेबसीरिजमध्ये कोणता सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहे, हे तरी गुलदस्त्यात आहे. “मुझे पैसे कमाने का कोई शौक नही” हा संवाद त्या टीझरमध्ये दिसतो. (Web Series)

सोबतच पुढे “पैसा कमाया नहीं, बनाया जाता है” आणि “लाइफ में आगे बढना है तो साहस तो करना पडेगा ना डार्लिंग” अशा आशयाचे देखील डायलॉग्स ऐकायला मिळतात. शेअर केलेल्या टीझरमध्ये अनेक युजर्स ‘रिस्क है तो इश्क है’ या डॉयलॉगप्रमाणेच ‘स्कॅम २००३’मधले हे डायलॉगही चांगलेच व्हायरल होतील, असे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.

२ सप्टेंबर २०२३ ला ही वेबसीरिज ‘सोनी लीव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता गगन देव या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता आणि तुषार हिरनंदानी यांच्याकडे आहे. ‘स्कॅम २००३’ ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT