Sonu Sood Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Post: हॉटेलचे बिल आणि ती चिठ्ठी ...अभिनेता सोनू सूद झाला भावुक

Sonu Sood Post For Fan: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा नेहमी चर्चेत असतो. सोनू सूद त्याच्या अभिनयासोबत सामाजिक कार्यामुळे ओळखला जातो. नुकतेच सोनू सूदचे एका चाहत्याने अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sonu Sood Post For His Fan Who Pays His Restaurant Bill:

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा नेहमी चर्चेत असतो. सोनू सूद त्याच्या अभिनयासोबत सामाजिक कार्यामुळे ओळखला जातो. सोनू सूदने कोरोना काळात अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. त्यासाठी लोकांनी त्याचे खूप आभार मानले होते. नुकतंच एका हॉटेलमध्ये सोनू सूदचे बिल भरुन एका चाहत्याने त्याचे हटके स्टाईलने आभार मानले आहेत. यासंदर्भात सोनू सूदने सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

सोनू सूद एका हॉटेमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्याचे बिल भरले. त्यासाठीच सोनू सुदने कृतज्ञता व्यक्त केली आहे. (Latest News)

सोनू सूदने सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहलेल्या चिठ्ठीचा फोटो शेअर केला आहे. 'देशातील तुम्ही केलेल्या सर्व चांगल्या कामासाठी खूप खूप धन्यवाद' असं त्या चिठ्ठीवर लिहलं आहे.

सोनू सूदने या फोटोवर कॅप्शन लिहलं आहे. 'हे कोणी केलं ते मला माहित नाही पण एका रेस्टॉरंटमध्ये आमच्या जेवणाचे संपूर्ण बिल कोणीतरी भरले. आणि ही गोड चिठ्ठी दिली. त्याच्या या कृत्याने मी खूप भावूक झालो आहे. धन्यवाद मित्रा', असं त्याने म्हटलं आहे.

सोनू सूद नेहमी लोकांसाठी काही न काही काम करत असतो. त्याच्या या सामाजिक कामासाठी त्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत असते. काही दिवसांपूर्वी इंडियन क्रिएटिव्ह युनिटी ने अजितवाल मोगा येथे 1.17 लाख चौरस फुटांवर सोनू साठी एक उल्लेखनीय पॉप आर्ट मास्टरपीस केला होता. तसेच एका चाहत्याने मै भी सोनू सूद मोहिम सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT