sonu sood fitness secret Social Media
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Workout : सोनू सूदला अशा अवतारात कधी बघितलंय का? फिटनेस सीक्रेटचा VIDEO

Sonu Sood Fitness Mantra : सोनू सूद इतका फिट कसा आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून नक्कीच सापडेल.

Saam Tv

सोनू सूद. नाम हीं काफी हैं... सोनू सूद म्हटलं की आठवतो टॉलिवूड आणि बॉलिवूडमधला स्मार्ट खलनायक. भारदस्त, पीळदार शरीरयष्टी आणि नजरेत तितकाच खुनशीपणा...पण हा झाला रील लाइफमधला सोनू सूद. रीअल लाइफमध्ये तो वेगळाच आहे. कोविडचा काळ आठवला तर, त्यातून तो किती 'दिलदार' आहे हे लक्षात येतं. 'मसिहा' म्हणून प्रसिद्ध असलेला सोनू सूद (Sonu Sood) आपल्या फिटनेससाठी देखील ओळखला जातो. नुकताच त्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो व्हिडिओ बघितला तरी, सोनू सूदचं फिटनेस सीक्रेट माहिती होईल.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Bollywood Actor) दोन गोष्टींसाठी फेमस आहे. एक म्हणजे गरिबांना मदत आणि दुसरं त्याची पीळदार शरीरयष्टी. त्यामुळं सगळ्यांचाच सोनूवर भरवसा असतो. आता त्यानं सोशल मीडियावर (Social Media) तुफान उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्याच्या जीममधील वर्कआउटची (Gym Workout) एक झलक या व्हिडिओतून बघायला मिळतेय. हा व्हिडिओ बघितल्यानंतर चाहते तर अक्षरशः शॉक झाले. 'अरे बापरे!' अशाच काहीशा प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत.

अॅब्ज फ्लॉन्ट केले

सोनू सूदनं जीममधला वर्कआऊटचा (Sonu Sood Workout) व्हिडिओ शेअर करतानाच अॅब्ज फ्लॉन्ट केले. त्याला एकदम शिस्तबद्धपणे आयुष्य जगायला आवडतं. आठवड्यातून ५ दिवस वर्कआऊट करतो. त्यात कार्डिओ, वेट लिफ्टिंग, योगा आणि कॅलिस्थेनिक्स यांचा समावेश असतो. सोनू सूदनं दिलेल्या टिप्समुळं फॅन्सने त्याचे आभार मानले.

नव्या सिनेमाबद्दल जाणून घ्या

सोनू सूदचा फतेह हा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करत आहे. प्रेक्षकांना तर या सिनेमाची उत्सुकता आहेच, पण तो स्वतःच खूप उत्सुक आहे. यात नसिरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमात सायबर क्राइम आणि अॅक्शन असणार आहे. येत्या १० जानेवारी २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

फिटनेससाठी नेमकं काय करतो?

सिनेमा क्षेत्रात कितीही मोठं नाव असलं तरी सोनू सूद फिटनेसच्या बाबतीत खूपच सीरीअस आहे. तो नियमित वर्कआउट करतोच, पण सायकलिंग हा देखील त्याच्या दिनचर्येचा भाग आहे. सकाळ-संध्याकाळ रनिंगही करतो. त्यामुळेच तो एकदम फिट अँड फाइन दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

ST Bus: यापुढे शाळांच्या सहलीसाठी फक्त 'लालपरी'च, खासगी बस वापल्यास होणार कारवाई; नवे नियम काय?

ठाकरेंना धक्का बसणार? महत्त्वाच्या शिलेदाराची सरनाईकांसोबत चर्चा, वाचा भेटीत दडलंय काय

Chavalichi Usal Recipe: झणझणीत चवळीची उसळ सोप्या पद्धतीनं कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: तीन दिवस ठाणे शहरात ३० टक्के पाणी कपात

SCROLL FOR NEXT