“कर भला, हो भला,... सोनू सूदने 'त्या' आरोपांवर अखेर सोडलं मौन twitter/@SonuSood
मनोरंजन बातम्या

“कर भला, हो भला,... सोनू सूदने 'त्या' आरोपांवर अखेर सोडलं मौन

काही दिवसांपुर्वी ह्याच सोनू सूद याच्यावर आयकर विभागाने इनकम टॅक्स चोरीचा आरोप केला होता. याप्रकरणी त्याने आता मौन सोडत आपली बाजू मांडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन लावल्यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांचे अक्षरशः हाल झाले होते. अशा संकटाच्या वेळी मसीहा बनून आलेला बॉलिवुड सुपरस्टार सोनू सूद याने मजूरांना मोठी मदत केली होती त्यामुळे तो देशभरात सुपरहिरो ठरला होता. मात्र ह्याच काही दिवसांपुर्वी ह्याच सोनू सूदवर आयकर विभागाने इनकम टॅक्स चोरीचा आरोप केला होता. याप्रकरणी त्याने आता मौन सोडत आपली बाजू मांडली आहे. (Sonu Sood finally leaves silence on income tax evasion charges)

हे देखील पहा -

सोनू सूदने ट्विटरवर “सख्त राहों में भी आसान सफर लगता है,हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है” असं कॅप्शन देत एक आपलं स्टेटमेंट शेयर केलं आहे. त्यात तो म्हणतो की, ''जेव्हा प्रत्येक भारतीयांचा आशिर्वाद पाठिशी असतो तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो. आपल्याला स्वत:ची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्यापरीने आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे.

माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रसंगी, मी विविध ब्रॅण्डसना माझ्या कामाची फी गरजुंना दान करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. काही पाहूण्यामुळे मी गेल्या चार दिवसांपासून व्यस्त असल्याने तुमच्या सेवेत येऊ शकलो नाही. आता मी पुन्हा आलो आहे. माणुसकीसाठी माझी सेवा अशीच सुरु राहिल.” असं म्हणत सोनूने आपली बाजू मांडली आहे. आणि शेवटी “कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद” या ओळी लिहील्या आहेत.

सोनू सूदला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही समर्थन देत त्याचं कौतुक केलं आहे. “सोनू सूद तुम्हा लाखो भारतीयांचे हिरो आहात” अशा शब्दांत केजरीवाल यांनी सोनूचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे देशभरातील त्याच्या चाहत्याकडूनही सोनूला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र त्याच्यावरील आरोपांवर कितपत तथ्या आहे हे येणारा काळच सांगेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT