Sonu sood: बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, माजी खासदार मिमी चक्रवर्ती, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता सोनू सूदला बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅपबाबत सोनू सूद ईडीच्या नजरेत आला आहे.
सोनू सूदला कधी आणि का बोलावण्यात आले?
ईडीने सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीचा असा विश्वास आहे की भारतात बंदी असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी प्रमोशनल संबंध होता. हे अॅप बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या ब्रँडिंगमुळे या अॅपला किती प्रमाणात फायदा झाला आणि त्याच्याशी संबंधित पेमेंट नियमांचे उल्लंघन झाले का याचा तपास ईडी करत आहे.
ईडीचा तपास
अंमलबजावणी संचालनालय बऱ्याच काळापासून इंटरनेटवर चालणाऱ्या अशा बेटिंग वेबसाइट्सवर लक्ष ठेवून आहे, जे भारताच्या कायद्याविरुद्ध आहेत. या प्लॅटफॉर्मद्वारे केवळ बेटिंग होत नाही तर हवाला आणि मनी लाँड्रिंगसारखे गैर प्रकार होत असल्याचा संशय आहे. आता या प्रकरणांमध्ये चित्रपट सिलिब्रिटी आणि खेळाडूंची नावे समोर येत असल्याने, तपास आणखी वाढवण्यात आला आहे.
उर्वशी रौतेलालाही बोलावण्यात आले आहे
माहितीनुसार, मिमी चक्रवर्तीला १५ सप्टेंबर रोजी आणि उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अॅप्सच्या प्रचार आणि प्रसिद्धीमध्ये या स्टार्सनी किती प्रमाणात भूमिका बजावली आहे हे तपास यंत्रणेला समजून घ्यायचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.