Sonam Kapoor  saam tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor : कुणीतरी येणार येणार गं! सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी शॉवरचे सुंदर PHOTOS पाहा

Sonam Kapoor Baby Shower : बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतेच तिचे थाटामाटात बेबी शॉवर पार पडले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.

नुकतेच सोनम कपूरचे बेबी शॉवर पार पडले आहे.

बेबी शॉवरला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने अलिकडेच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.सोनम कपूर लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. कार्यक्रम कोणताही असो, ती तिच्या स्टाइलने सर्वांना थक्क करते. नुकतेच सोनम कपूरचा बेबी शॉवर सोहळा थाटात पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बेबी शॉवर

रविवारी (8 फेब्रुवारी 2026) ला सोनम कपूरचे डोहाळे जेवण थाटामाटात पार पडले. अनेक सेलिब्रिटींनी बाळाला आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला हजेरी लावली. सोनम कपूरने बेबी शॉवरमध्ये लाईम ग्रीन रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सोनम कपूर या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. बेबी बंप फ्लॉन्ट करत होती. सोनम कपूरच्या या आनंदात करीना कपूर खान ते अनुपम खेर असे अनेक कलाकार पोहचले.

लग्नगाठ

2018 मध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 ला त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. त्यांना पहिला मुलगा झाला, ज्याचे नाव वायु (Vayu) असे आहे. आता हे जोडपे आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. आता 40 व्या वर्षी सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.

चाहता वर्ग

सोनम कपूरच्या बेबी शॉवरच्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकीकडे चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी तिला तिच्या ड्रेसिंगवरून ट्रोल देखील करत आहे. सोनम कपूर कायम आपल्या स्टाइलमुळे चर्चेचा विषय बनते.

वर्कफ्रंट

सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आजवर सोनम कपूरने अनेक हिट चित्रपट केले आहेत. यात आयशा, रांझणा, आय हेट लव्ह स्टोरी, निर्जा, संजू अशा चित्रपटांची नावे आहेत. तिला अनेक चित्रपटांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT