Sonali Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonali Kulkarni: संजय दत्तसोबत बेडरूम सीन करताना थरथर कापत होती सोनाली, नेमकं काय झालं होतं?

Sonali Kulkarni Birthday: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संजय दत्तसोबत मिशन काश्मीर चित्रपटात काम केले आहे. यावेळचा किस्सा तिने शेअर केला आहे.

Manasvi Choudhary

मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. आज ३ नोव्हेंबरला सोनाली कुलकर्णी तिचा ५० वाढदिवस साजरा करत आहे. सोनालीचा जन्म पुण्यात झाला आहे.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली. पण तिला 'दायरा' या हिंदी चित्रपटातून ओळख मिळाली. सोनाली एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती, लेखिका आणि नृत्यागंणा देखील आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनालीने संजय दत्त, सैफ अली खान या सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे. संजय दत्तसोबत मिशन काश्मीर चित्रपटात ती दिसली होती. चित्रपटात तिने संजय दत्तच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यावेळचा किस्सा तिने शेअर केला आहे. सोनालीला सुरूवातील भिती वाटायची.

सोनालीने तिच्या मुलाखतीत सांगितले की, "आमचा एक सीन होता. त्या सीनला बेडरूम सीन असं नाव दिलं होतं. ज्याची काहीच गरज नव्हती. पण होत असं कधी कधी... तिथे जी हेअर ड्रेसर होती तिने मला कॉस्च्युम घातल्यानंतर अचानक विचारलं की तू वॅक्सिंग वगैरे केलंस का ? मी गोंधळले आणि तिला हो म्हटलं. पण तिने असं विचारल्यानंतर मी खूप नर्व्हस झाले होते."

"मी सीनसाठी गेले, माझी पोझिशन घेतली. पण, माझं काही लक्ष लागत नव्हतं. माझे शरीर कापत होते. माझे हात थरथरत होते. सीन असा होता की संजय दत्त म्हणतो अज अलताफबन मुझे अब्बा बुलाया... त्यावर मी त्याला म्हणते की उसने पहले ही मुझे अम्मी बुलाया है... त्यानंतर आम्हाला मिठी मारायची होती. पण, मी नर्व्हस झाले होते. संजय दत्तला ते कळलं, त्यांनी मला बोलवून एक मिनिट बसायला सांगितलं. तो म्हणाला हे बघ यामध्ये आपल्याला किसही करायचं नाहीये. काहीच नाहीये. फक्त डायलॉग आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिठी मारायची आहे. आधीच मी नर्व्हस आहे. त्यात तू आणखी नर्व्हस झालीस तर ही सीन होणार नाही. तर तू थोडं शांत हो. त्यानंतर मग आम्ही हा सीन पूर्ण केला."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

SCROLL FOR NEXT