Sonali Bendre SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonali Bendre : "तेव्हा मी..."; सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन

Sonali Bendre -Raj Thackeray : सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यावर आता सोनाली बेंद्रेने मौन सोडलं आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. अनेक वेळा सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत जोडलं गेले होते. मुंबईत मायकल जॅक्शनच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडीओमुळे सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता यावर सोनाली बेंद्रेने आपले प्रतिक्रिया दिली आहे. मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांनी 30 वर्षांनी मुंबईत 'अभिजात मराठी भाषा गौरव' दिनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली होते. येथे ते एकत्र दिसले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांना खुणावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आजही व्हायरल होतो.

आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोनाली बेंद्रेने या विषयावर मौन सोडलं आहे. सोनाली बेंद्रेला मुलाखतीत तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, "मी माझ्या बहिणीशी बोलत होते. ती देखील तिथेच उभी होती. लोक जेव्हा याबद्दल बोलतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही. महत्त्वाचे म्हणजे आमची कुटुंबे यात सहभागी आहेत. आमच्या घराचे ठाकरे कुटुंबाशी खूप चांगलचे आणि जुने नाते आहे."

पुढे सोनाली म्हणाली," माझे भाऊजी क्रिकेटपटू असून ते राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीबरोबर क्रिकेट खेळायचे. तसेच माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये एचओडी होत्या ज्या आम्हाला इंग्रजी साहित्य शिकवायच्या. राज यांची पत्नी शर्मिला, त्यांची आई आणि माझी मावशी या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला यांनी 10 दिवस मला सांभाळलं होतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT