Sonakshi Sinha Brother On Her Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ कुठे होते?, लव्ह सिन्हाने सांगितलं बहिणीच्या लग्नाला न येण्यामागचं कारण...

Sonakshi Sinha Brother On Her Marriage : आंतरधर्मीय विवाहाला सोनाक्षीच्या आई- वडिलांसह तिच्या भावांनीही नाराजी दर्शवली होती. सोनाक्षीच्या भावांनी लग्नाला हजेरी लावली नव्हती. लग्नाला उपस्थित न राहण्याचं नेमकं कारण काय ?

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने रविवारी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर या कपलचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या आंतरधर्मीय विवाहाला सोनाक्षीच्या आई- वडिलांसह तिच्या भावांनीही नाराजी दर्शवली होती. शेवटी हा तणाव मिटला आणि सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या आई- वडिलांनी उपस्थिती लावली. पण लग्नाला सोनाक्षीच्या भावांनी हजेरी लावली नव्हती. त्यांनी लग्नाला उपस्थित न राहण्याचं नेमकं कारण काय ? जाणून घेऊया...

झहीरच्या बांद्राच्या घरी रविवारी सोनाक्षी आणि झहीरचं रजिस्टर मॅरेज पार पडला. यावेळी लग्नाला सोनाक्षीच्या फॅमिलीनेही उपस्थिती लावली होती. पण यामध्ये तिच्या भावांची म्हणजेच लव्ह आणि कुशची उपस्थिती नव्हती. लग्नानंतर लव्ह सिन्हाने प्रतिक्रिया दिलेली आहे. पण त्यांनी नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. मला थोडासा वेळ द्या, लवकरात लवकर या गोष्टीचा मी खुलासा करेल, अशी त्याने प्रतिक्रिया दिलेली आहे.

हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना लव सिन्हाने सांगितलं की, मला थोडासा वेळ द्या. एक-दोन दिवसात मी लग्नाला का नव्हतो आलो ? याचं स्पष्टीकरण देईल. सध्या मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. सोनाक्षी- झहीरचं लग्न ठरल्यापासून लव आणि कुशने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापुर्वीही लव सिन्हाला सोनाक्षीच्या लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. पण लवने लग्नाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात लव सिन्हा आणि कुश सिन्हा दोघेही हजर नव्हते. त्यामुळे सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरैशीचा भाऊ साकिब सलीमने सोनाक्षीच्या भावाची भूमिका साकारली होती. सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोल आला असून यात साकिब लग्नातील प्रथा पार पाडताना दिसत आहे. याशिवाय सोनाक्षीचे मित्रही यात सहभागी झाले होते.

सोनाक्षी- झहीरने सात वर्ष एकमेकंना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांनी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचही आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीतले आणि रजिस्टर मॅरेज दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

SCROLL FOR NEXT