Sonakshi Sinha SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha : सोनाक्षीने नवऱ्यासोबत एन्जॉय केली स्लिंगशॉट राइड,व्हिडीओ पोस्ट करत लिहिले...

Sonakshi-Zaheer Enjoyed Slingshot Ride : सोनाक्षी सिन्हाने आपल्या हनिमुनचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती आणि झहीर इक्बाल स्लिंगशॉट राईडचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Shreya Maskar

बॅालिवूडची सुपर कूल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच अलिकडेच लग्न पार पडल आहे. ती सध्या आपली मॅरेज लाईफ एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. सोनाक्षी आणि झहीर लग्नानंतर कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

लग्नानंतर सोनाक्षी आपल्या नवऱ्यासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. नुकताच सोनाक्षीने ( Sonakshi Sinha ) झहीरसोबतचा खास व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी झहीरसोबत स्लिंगशॉट राइडची (Slingshot Ride ) मज्जा लुटताना दिसत आहे.

सोनाक्षी आणि झहीरने २३ जून रोजी लग्नगाठ बांधली. आता ते दोघ मस्त फिरताना पाहायला मिळत आहेत. सध्या हे जोडपं अमेरिकेत हनिमुन एन्जॉय करत आहे. लग्न झाल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने ( zaheer Iqbal) त्यांच्या हनिमुनचे अनेक व्हिडिओ , फोटो शेअर केले आहे. नुकताच सोनाक्षीने त्यांच्या स्लिंगशॉट राइडचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनाक्षी-झहीर स्लिंगशॉट राइड

सोनाक्षी-झहीर व्हिडिओमध्ये स्लिंगशॉट राइडचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी आणि झहीर आकाशात खूप उंच भरारी घेऊन खाली येताना दिसत आहे. हा स्लिंगशॅाट राइडचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून खूप कमेंट्स येत आहेत. सोनाक्षीने हा व्हिडिओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं की, 'स्लिंगशॉट' असे लिहून पुढे तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शेवटी ज्या 'गोष्टी आपण प्रेमासाठी करतो…' असे लिहिलं आहे. यावर पती झहीरने कमेंट करून पुढच्या राइड बद्दल सांगितले आहे. त्यांनी लिहिलं की, 'नेक्स्ट स्टॉप स्ट्रॅटोस्फीअर टॉवर'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT