Sonakshi- Zaheer Chaiyya Chaiyya Song Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi- Zaheer Dance Viral Video : सोनाक्षी- इक्बालने रिसेप्शन पार्टीत 'छैय्या- छैय्या' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, हूक स्टेप्सची होतेय चर्चा

Sonakshi- Zaheer Chaiyya Chaiyya Song Viral Video : सोनाक्षी आणि झहीरने रिसेप्शनमध्ये शाहरूख आणि मलायकाच्या 'छैय्या छैय्या' गाण्यावर अफलातून डान्स केला होता.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं नुकतंच थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. फॅमिली आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांचे रजिस्टर मॅरेज पार पडले. त्यानंतर सोनाक्षी-जहीरने फॅमिली आणि सेलिब्रिटी मित्रांसाठी एक मोठं रिसेप्शन देण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीरच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

विरल भयानी या सेलिब्रिटी पापाराझीने त्यांच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोनाक्षी आणि झहीरने रिसेप्शनमध्ये शाहरूख आणि मलायकाच्या 'छैय्या छैय्या' गाण्यावर अफलातून डान्स केला होता. सध्या दोघांच्याही डान्स हूक स्टेप्सची जोरदार चर्चा होत असून कौतुक केलं जात आहे. अक्षरश: गुडघ्यावर बसून दोघांनीही डान्स केला. उपस्थितांसह सर्वांनीच त्यांच्या डान्स कौतुक केले आहे.

झहीरसोबतच्या आंतरधर्मीय विवाहामुळे सोनाक्षीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. लग्नावेळी शत्रुघ्न सिन्हा आपल्या लेकीच्या बाजुलाच उभे होते.

यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान तर होतेच, पण सोबतच चेहरा भावूकही होता. सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाक्षी- झहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सोनाक्षी- झहीर २३ जून २०१७ पासून एकत्र आहेत. त्यांनी लग्न २३ जून २०२४ ला केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT