Sulochana Chavan google
मनोरंजन बातम्या

Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

Lavani Swarotsav: लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हा लावणी स्वरोत्सव 13 मार्च रोजी विलेपार्लेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त 'सोळावं वरीस धोक्याचं' हा अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात शुक्रवार 13 मार्च रोजी सायंकाळी 8.30 वाजता हा सांगीतिक सोहळा होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा स्वरोत्सव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या निमित्ताने लावणी परंपरेचा सुवर्ण ठेवा जपणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या कलास्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगताप यांच्या सुरेल आवाजात लावण्या सादर करणार आहेत. निवेदन परेश दाभोळकर यांचे असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडयूकेअर फार्मास्युटिकलचा परवाना रद्‌द

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT