Guligat Shared His Family Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Guligat Suraj Chavhan : कॅन्सरमुळं वडिलांना गमावलं, आई अन् आजीला परिस्थितीनं हिरावलं; बिग बॉसच्या सूरज चव्हाण झाला इमोशनल

Chetan Bodke

नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सुरूवात झाली आहे. होस्ट रितेश देशमुखने आपल्या हटक्या अंदाजात सर्व स्पर्धकांचं दणक्यात स्वागत केलं. यंदाच्या सीझनमध्ये मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी असून सोशल मीडिया एन्फ्लूएंसरनेही सहभाग घेतला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती, सोशल मीडिया एन्फ्लूएंसर सुरज चव्हाणची. त्याने ‘गुलीगत धोका’ म्हणत चाहत्यांचे सोशल मीडियावर निखळ मनोरंजन केले. नुकतंच सुरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात त्याने संपूर्ण प्रवास सांगितला आहे.

कोरोना काळात सोशल मीडिया एन्फ्लूएंसरची कमालीची क्रेझ होती. त्याच काळात सुरज चव्हाणनेही चाहत्यांचे कॉमेडी रिल्स बनवून मनोरंजन केले. तो आज आपल्या कॉमेडी रिल्समुळेच प्रसिद्धीझोतात आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नाही. त्याने त्याचा संपूर्ण प्रवास ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांसोबत शेअर केला आहे. तो म्हणतो, "माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता. तो कॅन्सर संपूर्ण शरीरात भिनला होता. त्यामुळेच त्यांचे निधन झाले. वडिलांचा विचार करून आईला वेड लागलं होतं. आई कायमच माझ्या वडिलांचाच विचार करत राहायची. तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या."

"रक्ताच्या उलट्या झाल्या की, तिला खूप त्रास व्हायचा. शेवटी शेवटी ती खूप खच्चून गेली होती. इकडे माझ्या आईने जीव सोडला आणि तिकडे माझ्या आजीने जीव सोडला. दोघींनी शेवटच्या क्षणी एकमेकींचे तोंडंही पाहिले नाहीत. मला कोणीच नाही म्हणजे आई- बाबा आणि आजी- आजोबा असं कोणीच नाही. फक्त आत्या आणि पाच बहिणी आहेत. खरंतर मला ७ बहिणी होत्या. पण त्यातील काही वारल्या आणि मी आठवा होतो." सुरजने आपल्या फॅमिलीबद्दल सांगत असताना पॅडी कांबळे म्हणतो, तू आता हे रिल्स वैगेरे करतो, तर ते तुला काही बोलत नाहीत का?

यावर सुरज म्हणाला, "माझ्या बहिणी मला म्हणतात, आपल्याला लोकांनी खूप लुटलं आहे ना. तर तू फक्त सुधर आणि लोकांची उधारी पूर्ण करून टाक. तू यशस्वी झालास की आम्हाला खूप आनंद होईल. मला सोशल मीडियातून दिवसाला ८०,००० रुपये मिळायचे. मला लोकं अनेक ठिकाणी उद्घाटनाला बोलवायचे. मला फक्त रिबीन कापायचेच हजारो रुपये मिळतात. मला हे पैसे टीक टॉकच्या काळात मिळायचे. पण आता मला ३०,००० ते ५०,००० इतके मिळतात."

सुरज चव्हाण मुळचा बारामती जिल्ह्यातील मोरगाव शेजारील मोडवे गावात राहतो. सुरजचा जन्म एका गरीब कुटुंबात झालेला आहे. त्याचं शिक्षण ८ वी पर्यंतच झालेलं आहे. दररोज मोलमजुरी करुन सुरजने आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. सुरजचे अनेक डायलॉग्ज आजही फेमस आहेत. 'प्रेमासाठी कायपण', 'बुक्कीत टेंगुळ', 'गुलीगत' असे त्याचे डायलॉग फेमस आहेत. भारतात टिक टॉक बंद झाल्यानंतर सुरजने इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT