Social Media Star Mangesh Kakad Saam TV
मनोरंजन बातम्या

Mangaaji Struggle Story : इन्फ्लुएन्सर मंगाजीची फिल्मी कहाणी ; शेतकरी ते सोशल मीडिया स्टारपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Social Media Star Mangesh Kakad Inspiring journey: काही सेकंदं किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून लक्ष वेधून घेणारी अनेक मंडळी आजकल सोशल मीडियावर दिसतात. सोशल मीडिया जसजसा जसजशी लोकप्रिय होऊ लागला तसतसे अनेकजण आपल्या कलागुणांचे सादरीकरण सोशल मीडिया करू लागले.

आज अनेक ‘इन्फ्लुएन्सर्स’ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या यादीत ‘मंगाजी’ म्हणजेच नाशिकच्या मंगेश काकड या तरुणाने अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Latest Entertainment News)

शेतकरी कुटुंबातून आलेल्या मंगेशला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयातून प्ररेणा घेत वेगवगळ्या मिमिक्रीने सगळ्यांची दाद मिळवणाऱ्या मंगेशला आपण कला क्षेत्रात पाऊल टाकू याची कल्पना नव्हती.

मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे शिक्षणाला महत्त्व होत. शिक्षण पूर्ण करताना सवड मिळेल तशी अभिनयाची आवड तो जपत होता. अभ्यास आणि नाटक असा प्रवास करताना मुंबईत येऊन स्वतः:ची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मंगेशने काही काळ नामांकित कंपनीत काम केलं.

पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेल्या मंगेशला मात्र आपल्यातील अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत त्याने अनेक सन्मान प्राप्त केले. प्रायोगिक रंगभूमीवरील ‘बट बिफोर लिव्ह’ या गाजलेल्या नाटकाचे त्यांनी महाराष्ट्रभर अनेक प्रयोग केले.

मुबंईत येण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मंगेश याने अखेर नोकरी सोडून मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. पण कोविडचा प्रादुर्भाव आला आणि त्याचं मुंबईत येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आणि कोविडचं संकट याही परिस्थितीत हार न मानता त्याच्या एकपात्री अभिनय कौशल्यातून त्याने छोटे छोटे मनोरंजक व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट सुरुवात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT