Smriti Mandhana-Palash Muchhal Saam tv
मनोरंजन बातम्या

Smriti Mandhana-Palash Muchhal: स्मृती मंधाना- पलाश मुच्छल लवकरच अडकणार विवाह बंधनात...? नेमकं खर कारण काय?

Smriti Mandhana-Palash Muchhal: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची नवीन तारीख जाहीर झाली असल्याची बातमी आली होती. आता याबद्दल एक नविन अपडेट समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding Date: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता ७ डिसेंबर रोजी लग्न होणार असल्याचे अनेक वृत्त मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृतीचा भाऊ श्रवण मंधानाने आता स्पष्ट केले की लग्नाच्या या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही.

स्मृतीचा भाऊ श्रवण मंधाना हिन्दूस्थान टाईम्स सोबत बोलतातना म्हणाला "मला या अफवांबद्दल काहीही माहिती नाही. पण, सध्या तरी (लग्न) पुढे ढकलण्यात आले आहे. त्याच्या या विधानामुळे स्मृती आणि पलाशच्या ७ डिसेंबर रोजी लग्न होणार असल्याचे अफवांवर पूर्णविराम लागला आहे.

सांगली येथे होणारा विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी अनपेक्षित परिस्थितीत लग्न थांबवण्यात आले. कारण स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच, पलाशालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारण या घटनेमुळे त्याची तब्येत बिघडली म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याच्या आईने उघड केले की त्याला आयव्ही सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि डिस्चार्ज देण्यापूर्वी अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या.

सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी मौन बाळगले असले तरी, लग्न स्थगित केल्याने ऑनलाइन अटकळ निर्माण झाली. आरोग्याच्या भीतीपलीकडे. वैयक्तिक संभाषणांचे कथित स्क्रीनशॉट लीक झाले आणि सोशल प्लॅटफॉर्मवर पलाशवर फसवणुकीचे आरोप होऊ लागले. यामुळे स्मृतीने तिच्या लग्नाच्या पोस्ट आणि प्रपोजल व्हिडिओ सोशल मिडीयावरुन डिलिट केला. तसेच तिने पलाशशी संबंधित सोशल मीडिया टॅग काढून टाकल्याने सोशल मिडीयावर या प्रकरणाची आणखी चर्चा रंगली.

ऑनलाइन गोंधळ असूनही, स्मृती किंवा पलाश दोघांनीही फसवणुकीच्या अफवांवर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. त्यांच्या इंस्टाग्राम बायोसमध्ये एक छोटी अपडेट केली आहे. यामध्ये दोघांनी ही बायोमध्ये वाईट नजरेचा इमोजी लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोकसभेत 8 डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षावर आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मतदानला शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मतदारांची धावपळ

Mansi Naik Photos: हॉट अन् बोल्ड मानसी नाईक, फोटो पाहून घायाळ व्हाल

SCROLL FOR NEXT