Smriti Irani's Marriage Advice Video Instagram @smritiiraniofficial
मनोरंजन बातम्या

Smriti Irani's Marriage Advice: स्मृती इराणी यांचा विवाहित दाम्पत्यांना मोलाचा सल्ला; शेअर केला दयाबेन - जेठालालचा

Smriti Irani's Shared TMKOC Video On Instagram: जेठालाल आणि दयाबेनचा कॉमेडी व्हिडिओ शेअर करून त्यांनी लग्नाबाबत सल्ला दिला आहे.

Pooja Dange

Smriti Irani Share Video Of Dayaben - Jethalal: अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अनेकदा इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी अनेक पोस्ट शेअर करत असतात. कधीकधी त्या मीम्स देखील शेअर करतात. पण अलीकडेच स्मृती इराणी यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची एक जुनी क्लिप शेअर केली आहे. जेठालाल आणि दयाबेनचा कॉमेडी व्हिडिओ शेअर करून त्यांनी लग्नाबाबत सल्ला दिला आहे.

स्मृती इराणी यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे, ज्यामध्ये लग्नाबाबत एक सल्ला आहे. याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशी आणि दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी यांच्यात गप्पा सुरू आहेत.

पहिल्या व्हिडिओमध्ये जेठालाल दयाबेनला विचारत आहे, 'जेव्हा देव बुद्धी देत होता तेव्हा तू कुठे गेली होती?' याला प्रत्युत्तर देत दयाबेन म्हणते - तुझ्यासोबत सप्तपदी घेत होतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दयाबेन पती जेठालाल विचारते - मला सांगा एका किलोमध्ये गव्हाचे किती दाणे असतात? याचे जेठालाल उत्तर देऊ शकत नाहीत. तेव्हा दयाबेन त्याला बदाम खाण्याचा सल्ला देतात आणि बदाम भरवते.

व्हिडिओ शेअर करत स्मृती इराणी यांनी लिहिले आहे की, 'या कथेचा सार असा आहे की ज्यांनी सप्तपदी घेतल्या आहेत त्यांनी कृपया बदाम खा. दया भाभी रॉक्स. पहिली क्लिप इंटरनेटवरून आणि दुसरी क्लिप जेठालालची आहे.

स्मृती इराणी यांनी पोस्ट करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेटकरी स्मृती इराणी यांच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत. तसेच दयाबेनला पाहताच चाहत्यांना दिशा वकानीची आठवण आली. आता दिशा वकानीने लवकरच 'तारक मेहता'मध्ये दयाबेनच्या भूमिकेत परतावे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. (Latest Entertainment News)

दिशा वकानीने २०१७ मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर दिशा वकानीनेही तेव्हापासून स्वतःला अभिनयापासून दूर ठेवलं आहे. तेव्हापासून चाहते दिशा वकानीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत दिशा वकानी किंवा दयाबेनचे पात्र 'तारक मेहता'मध्ये परत आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT