Prateik Babbar change His Name Instagram @_prat
मनोरंजन बातम्या

Prateik Babbar Changes His Identity : स्मिता पाटीलच्या मुलाने स्वतःची ओळखच बदलली, काय आहे नेमकं कारण?

Prateik Babbar Changes His Name : अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने त्याचे नाव बदलले आहे.

Pooja Dange

Smita Patil Son Changes His Name : अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने त्याचे नाव बदलले आहे. त्याची आई आणि दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटीलला ट्रिब्यूट देण्यासाठी प्रतीकने हा निर्णय घेतला आहे. प्रतिकने निवेदनात त्याची नाव बदल्याची प्रक्रिया शेअर केली आहे.

प्रतीकने 2008 मध्ये जाने तू... या जाने ना या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर बऱ्याच चित्रपट, वेबसीरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीला आला. प्रतीक अनेकदा चर्चेत असतो. नाव बदलल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Latest Entertainment News)

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतीकने एका निवेदनात खुलासा केला की आतापासून त्याचे नवीन नाव त्याच्या चित्रपटांमध्ये दिसेल. त्यांनी आपल्या निर्णयाला 'अंधश्रद्धा, भावनेच्या भरतील निर्णय' म्हटले आहे.

प्रतीकने निवेदनात म्हटले आहे की, "माझे वडील आणि माझे संपूर्ण कुटुंब, माझे दिवंगत आजी आजोबा (आईचे आई-वडील)आणि माझी दिवंगत आई यांच्या आशीर्वादाने मी माझ्या आईचे आडनाव माझे मधले नाव म्हणून जोडण्याचा निर्णय घेतला आहे, माझ्या नवीन स्क्रीन नावाला जन्म दिला आहे 'प्रतिक पाटील बब्बर.' (Celebrity)

जेव्हा माझे नाव चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये किंवा त्या बाबतीत कुठेही दिसते, तेव्हा मला ते माझ्यासाठी, लोकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी तिच्या असामान्य आणि उल्लेखनीय वारशाची, माझ्या वारशाची आठवण व्हावी अशी माझी इच्छा आहे. तिचे तेज आणि महानतेची आठवण आहे. " (Movies)

प्रतिक पुढे म्हणाला, "माझी आई माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा एक भाग असेल ज्यामध्ये मी माझी जीव ओतून काम करत असतो, असे नाही की याआधी ती भाग नव्हती. परंतु माझ्या नावाचा भाग म्हणून तिचे आडनाव असण्याने भावना ही अधिक दृढ होईल.

या वर्षी ती आपल्याला सोडून 37 वर्षे झाली, ती आपल्यातून गेली पण आपल्या आठवणीतून नाही. तिला कधीच विसरता येणार नाही याची मी काळजी घेईन. स्मिता पाटील माझ्या नावाने देखील जिवंत राहतील..."

प्रतीक पाटील बब्बर मधुर भांडारकरांच्या इंडिया लॉकडाऊनमध्ये दिसला होता. तसेच त्याची फोर मोर शॉट्स ही वेबसीरीज देखील खूप लोकप्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT