Dil Dosti Deewangi Star Cast Saam TV
मनोरंजन बातम्या

Dil Dosti Deewangi Released: स्मिता गोंदकर - चिराग पाटील यांचा 'दिल दोस्ती दिवानगी' रिलीज; दिमाखात पार पडला चित्रपटाचा प्रीमियर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smita Gondkar, Veena Jagtap and Chirag Patil Movie:

कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या कलाकारांचा 'दिल दोस्ती दिवानगी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'दिल दोस्ती दिवानगी' हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. चित्रपटाच्या प्रीमियरला अनेक दिग्गज उपस्थित होते. आमदार आशिष शेलार यांनी देखील चित्रपटाच्या प्रीमियर हजेरी लावली होती.

'दिल दोस्ती दिवानगी' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. १३ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाला. काही अनपेक्षित घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग आणि प्रेमाचा प्रवास कोणत्या वळणांनी घडत जातो याची रंजक कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटामध्ये उलगडते.

चित्रपटाच्या प्रीमियर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी चित्रपटाच्या निर्मीती आणि दिग्दर्शनाचे कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती दिली. ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले. 'दिल दोस्ती दिवानगी' चित्रपटातील कलाकारांचा अभिनय उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया देखील मान्यवरांनी दिली आहे. (Latest Entertainment News)

ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुत ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांनी केली असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकार देखील या चित्रपटात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नवरात्रीत PM मोदी 9 दिवस फक्त पाणी पितात : देवेंद्र फडणवीस

Mohammad Kaif: 'धोनीसाठीच नियम बदलला, जोपर्यंत तो खेळतोय..' मोहम्मद कैफच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT