Sitaare Zameen Par: आमिर खानच्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' चा ट्रेलर १३ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि लगेचच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. चित्रपटात आमिर खान एका अपयशी बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत, ज्याला न्यायालयीन आदेशानुसार बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संघाला प्रशिक्षण द्यावे लागते. चित्रपटात जिनिलिया देशमुखचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट २००७ च्या 'तारे जमीन पर'चा सिक्क्वल आहे.
ट्रेलर प्रदर्शित होताच, अनेकांनी त्याची तुलना २०१८ च्या स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पियोनेस' (Campeones) आणि त्याच्या २०२३ च्या इंग्रजी रिमेक 'चॅम्पियन्स' (Champions) सोबत केली. रेडिटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात 'सितारे जमीन पर' आणि 'चॅम्पियन्स'च्या ट्रेलरमधील दृश्यांची फ्रेम-टू-फ्रेम तुलना करण्यात आली आहे. काही वापरकर्त्यांनी आमिर खानवर 'कॉपी-पेस्ट परफेक्शनिस्ट' अशी टीका केली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'सितारे जमीन पर' हा 'कॅम्पियोनेस'चा हिंदी रिमेक असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, सोशल मीडियावर काहींनी 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर आमिर खानने पुन्हा रिमेक करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहींनी चित्रपटाच्या सामाजिक संदेशाचे कौतुक केले असले, तरी अनेकांनी त्याच्या क्रिएटिव्हिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'सितारे जमीन पर' २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे आणि यात १० नवोदित कलाकारांचीही भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे, चित्रपटाच्या यशाबद्दल उत्सुकता आणि शंका दोन्ही निर्माण झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.