Bollywood News: सध्या आमिर खान (Aamir Khan) आणि जिनिलीया (Genelia ) यांचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'मुळे (Sitaare Zameen Par) चांगलेच चर्चेत आहेत. 2025 मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला 'सितारे जमीन पर' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून'सितारे जमीन पर' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. ट्रेलरमधून प्रेम, हास्य आणि आनंदाचा अनुभव पाहायला मिळत आहे.
'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 मधील सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर'चा एक भावनिक सीक्वल आहे. नुकतेच 'सितारे जमीन पर'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील एक सुंदर गाणं 'सर आँखों पे मेरे' (Sar Aankhon Pe Mere ) प्रदर्शित केलं आहे. याचा व्हिडीओ जिनिलीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अरिजीत सिंह याचा भावपूर्ण आवाजात हे गाणं ऐकायला मिळत आहे. आमिर खान आणि जिनिलीया देशमुख यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं प्रेमाची गोडी आणि शांतता याचा अनुभव देते. या नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू करते.
'सितारे जमीन पर' या चित्रपटातील 'सर आँखों पे मेरे' या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिले आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर आणि जिनिलियासोबत इतर अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात 10 नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर पाहायला मिळणार आहेत.
ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. 'सितारे जमीन पर' चित्रपट येत्या 20 जून 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.