Sitaare Zameen Par Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Collection : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, ६ दिवसांत जमवला तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 6 : आमिर खान आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सहा दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आमिर खान पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया झळकली आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. चित्रपटाने 6 दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • एकूण - 82.4 कोटी रुपये

सहा दिवसांत 'सितारे जमीन पर' चित्रपटाने 80 कोटींच्यावर कमाई केली आहे. आता चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. आमिर खान आणि जिनिलियाच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. 'सितारे जमीन पर' वीकेंडला किती कोटींची कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर'चित्रपटात 10 नवीन कलाकार पाहायला मिळत आहे. त्यांचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. या कलाकारांमध्ये अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT