Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Collection : आमिर-जिनिलियाची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, 'सितारे जमीन पर'नं 'या' चित्रपटांना टाकले मागे

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3 : आमिर-जिनिलियाच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने तीन दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच कलेक्शनमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

Shreya Maskar

आमिर आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत असून तो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

आमिर खान ( Aamir Khan) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia ) 'सितारे जमीन पर' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास 60 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • एकूण - 59.90 कोटी रुपये

'सितारे जमीन पर' नं मोडलं 'या' चित्रपटांचे रेकॉर्ड

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'सितारे जमीन पर' पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. 'सितारे जमीन पर'ने जाट, भूल चूक माफ, देवा आणि अक्षय कुमारच्या केसरी चॅप्टर २ या चित्रपटांना कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.

  • जाट - 40.25 कोटी रुपये

  • भूल चूक माफ - 28 कोटी रुपये

  • देवा - 19.49 कोटी रुपये

  • केसरी चॅप्टर २ - 29.5 कोटी रुपये

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. चित्रपटात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या नवीन कलाकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

Success Story: शाळेसाठी रोज १० किमीची पायपीट, सलग दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS वीर प्रताप सिंह यांचा प्रवास

Ardhakedra Yog: बुध-गुरु बनवणार दुर्मिळ राजयोग; 3 राशींच्या व्यक्तींची होणार एका रात्रीच चांदी

Friday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या मागे कटकटीची पीडा; आर्थिक ताण वाढणार, जाणून घ्या शुक्रवारचा दिवस कसा असणार?

SCROLL FOR NEXT