Utkarsh Shinde Saam tv
मनोरंजन बातम्या

Utkarsh Shinde : 'हे रसायन वेगळं आहे'; रील स्टार सूरज चव्हाणच्या बिग बॉसच्या घरातील गुलीगत एन्ट्रीवर उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट

Utkarsh Shinde on reels star suraj chavan : रील स्टार सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरातील गुलीगत एन्ट्रीवर उत्कर्ष शिंदेने खास पोस्ट केली आहे. 'हे रसायन वेगळं आहे', अशी प्रतिक्रिया उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणच्या गुलीगत एन्ट्रीवर केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सिझनचा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला आहे. या सिझनमध्ये 'बिग बॉस'च्या घरात १६ स्पर्धकांनी एन्ट्री केली आहे. या स्पर्धकांमध्ये रील स्टार सूरज चव्हाणनेही गुलीगत एन्ट्री केली आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सूरज चव्हाणच्या एन्ट्रीवर अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने खास पोस्ट केली आहे. हे रसायन वेगळं आहे, असं उत्कर्षने म्हटलं आहे.

'बिग बॉस' मराठी ५ च्या घरात अभिनेत्री, अभिनेते आणि कलाकारांसह सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये वर्षा उसगांवकर, निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अभिजित सावंत, घन: श्याम दरवडे धनंजय पोवार आणि गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण देखील असणार आहे.

बिग बॉस मराठीच्या सिझनमध्ये पहिल्यांदा सोशल मीडिया एन्फ्लूएंसरना सहाभागी होण्याची संधी मिळाली आहे. या सिझनमध्ये सहभागी झालेले सोशल मीडिया एन्फ्लूएंसरसोबत बॉलिवूड सेलिब्रिटीही खेळताना दिसणार आहे. १०० दिवसांच्या खेळात रूसवे- फुगवे, मैत्री, प्रेम आणि राडा पाहायला मिळणार आहे. याच खेळात टिकटॉकमुळे प्रसिद्धी मिळालेला सूरज चव्हाण देखील प्रतिष्ठापणाला लावणार आहे.

utkarsh shinde post

या रील स्टार सूरज चव्हाणसाठी गायक उत्कर्ष शिंदेनी खास पोस्ट केली आहे. 'स्पर्धक छान किंवा वाईट ठरवण्यात मजा नाही. सूरज चव्हाण असाच रॉ, फ्री, मोकळा, निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना याला सांभाळायचं कसं हे कळणार नाही. त्यामुळे सूरज हा बिग बॉसमध्ये मजा आणेल. हे रसायन वेगळं आहे, असे उत्कर्ष शिंदे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

दरम्यान, लहानपणी आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या रील स्टार सूरज चव्हाणला बहिणीने आधार दिला. हाच सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या घरात कसा खेळणार, याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT