Savani Ravindra Wished Asha Bhosle On Her Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Asha Bhosle Birthday Special Post: ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ सावनी रविंद्रची आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Savani Ravindra Post: राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Savani Ravindra Wished Asha Bhosle On Her Birthday

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये (Hindi And Marathi Film Industry) आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज ९० वा वाढदिवस. शास्त्रीय संगीत आणि गजलपासून ते पॉप म्युझिकपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आशा भोसले (Asha Bhosale) यांनी आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे.

त्यांच्या आवाजाचे चाहते फक्त भारतातच नाही तर, परदेशातही आहेत. आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी दिल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गायिका सावनी रविंद्र सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले तुम्हाला ९० व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...” अशा आशयाची पोस्ट गायिका सावनी रविंद्र यांनी केली आहे. सावनीने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सावनी आशा भोसले यांच्या पाया पडताना दिसत आहे. तर पुढच्या फोटोमध्ये सावनी आणि आशा भोसले यांचा एकत्र फोटो आहे.

आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दित फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रूसी या भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलं आहे. आशा भोसले यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गात विक्रम केला. आशा भोसले यांच्या गाण्याची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.

आओ हुजूर तुमको, पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने जो दिल को अशा अनेक गाण्यांची आजही क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे.‘दिस जातील दिस येतील’, ‘फुलले रे क्षण माझे’, ‘स्वप्नात साजना येशील का’ आशा भोसले यांचे हे मराठी गाणे चांगलेच गाजले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT