Rihanna Poses With Paparazzi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rihanna Poses With Paparazzi: “हॉलिवूडची असली तरीही ‘डाऊन टू अर्थ’ आहे...”; रिहानाच्या एका कृतीने भारतीय चाहते भारावले

Anant Ambani And Radhika Merchant Pri Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आलेल्या रिहानाचं सध्या भारतात जोरदार कौतुक होत आहे.

Chetan Bodke

Rihanna Poses With Paparazzi Viral Video

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग इव्हेंट गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

प्री-वेडिंग इव्हेंटला कालपासून सुरूवात झाली असून हा प्री- वेडिंग इव्हेंट ३ मार्चपर्यंत चालणार आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री- वेडिंग इव्हेंटसाठी फक्त भारतातीलच नाही तर, विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. अशातच सध्या चर्चा होतेय ती, जगप्रसिद्ध गायिका रिहानाची. रिहानाने अनंत आणि राधिकाच्या प्री- वेडिंग इव्हेंटमध्ये परफॉर्म केल्यानंतर आपल्या मायदेशी परतली आहे. (Singer)

गायिका रिहाना हिने अनंत आणि राधिकाच्या प्री- वेडिंग इव्हेंटसाठी भारतात २९ फेब्रुवारीला उपस्थिती लावलेली होती. ज्यावेळी रिहाना भारतात आली त्यावेळी तिने आणलेल्या सामानामुळे ती तुफान चर्चेत आली आहे. रिहानासोबत तिच्या टीमने देखील प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरमध्ये उपस्थिती लावली होती. रिहानाने प्री- वेडिंग इव्हेंटमध्ये परफॉर्म केल्यानंतर ती आपल्या मायदेशी परतली आहे. तिचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Gujrat)

अनंत आणि राधिकाच्या प्री- वेडिंग इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी गायिका रिहानाने बक्कळ मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. गायिकेला पाहण्यासाठी तिच्या भारतीय चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. गायिकेची क्रेझ पाहता काही पापाराझींनी “तुझ्याबरोबर आम्ही फोटो काढू का?” अशी विचारणा तिच्याकडे केली. यावर रिहानाने जराही विचार न करता आपल्या सुरक्षा रक्षकांना मागे हटण्यास सांगितलं आणि पापाराझींसह विमानतळावर आलेल्या सर्वसामान्य लोकांबरोबर तिने फोटो काढले. यामुळे तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. (Viral Video)

अनेक युजर्सने रिहानाची तुलना बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर केली आहे. अभिनेत्रीचा साधापणा भारतीय चाहत्यांना फारच भावला आहे. युजर्स व्हिडीओवर कमेंट करत म्हणतात, “बॉलिवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून काहीतरी शिकायलं हवं.”, “याला म्हणतात खरा कलाकार”, “हॉलिवूडची असली तरीही रिहाना ‘डाऊन टू अर्थ’ आहे”, “हिच्यात खरी माणुसकी आहे.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर केल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजपची साथ सोडणार?

सोलापूर-कोल्हापूरसाठी काँग्रेसनं उमेदवारांची नावं केली जाहीर, पाहा कुणाला कुठून मिळाले तिकिट

Earings Designs: कानातल्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स, ट्रेडिशनल ते वेस्टर्न कोणत्याही लूकवर उठून दिसतील

American CEO: बॉस असावा तर असा! कंपनी विकली अन् कर्मचाऱ्यांना दिले कोट्यवधी रुपये; एका रात्रीत श्रीमंत

Chocolate Chip Cookies: न्यू ईयरला लहान मुलांसाठी घरच्या घरी करा चॉकलेट चिप कुकीज, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT