Singer Neha Bhasin Mental Breakdown Wrote A Post Instagram
मनोरंजन बातम्या

Neha Bhasin : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका गेल्या २० वर्षांपासून करते दुर्धर आजाराचा सामना; म्हणाली, ‘मला खूप काही बोलायचंय पण…’

Chetan Bodke

बॉलिवूड आणि पंजाबमधील प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिने आपल्या आवाजाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. नेहाने आपल्या आजवरच्या करियरमध्ये अनेक हिट गायली आहेत. कायमच आपल्या आवाजामुळे चर्चेत राहणारी नेहा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहा गेल्या दोन दशकापासून एका दुर्धर आजाराशी लढा देते. तिने आपल्याला झालेल्या दुर्धर आजाराबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

नेहाने दिलेल्या माहितीनुसार, तिला FIBROMYALGIA नावाच्या आजाराने ग्रासले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेहाने सांगितले की, "मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे. पण कळत नाहीये तुमच्या समोर कशी व्यक्त होऊ. मला गेल्या काही वर्षांपासून काही तरी अडचण आहे. त्या अडचणीला मेडिकल टर्मने FIBROMYALGIA असं नाव दिलं. मला गेल्या २० वर्षांपासून त्रास होतोय. पण २ वर्षांपूर्वीच त्या आजाराबद्दल मेडिकल पेपर्सवर लिहिण्यात आले. आजाराबद्दल कळल्यापासून माझं मानसिक संतूलन बिघडत आहे."

"गेल्या काही महिन्यांपासून मला थकवा, वेदना, मानसिक त्रास आणि डिप्रेशन यामुळे मी त्रस्त आहे. यामुळे मला काही खाण्याचीही इच्छा नाही, व्यवस्थित झोपही लागत नव्हती, काम करम्याचीही इच्छा मनात नसायची. तणाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्रास होत असतानाही मी मागे हटले नाही. आरोग्याच्या बाबतीत चाहत्यांमध्ये जागृती व्हायला हवी. आजारपणामुळे मी पूर्णपणे खचले. खरंतर मी गेल्या अनेक दिवसांपासून त्रास सहन करते. सत्य स्वीकारल्यामुळे मनावरील ताण कमी होतो."अभिनेत्रीची ही इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते तिला लवकरात लवकर बरे होण्याचे आवाहन करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT