Singer Mukesh 100th Birth Anniversary  Facebook @MukeshMelodies
मनोरंजन बातम्या

Singer Mukesh 100th Birth Anniversary : दिग्गज गायक मुकेश त्यांची १००वी जयंती होणार साजरी; नील नितीन मुकेशने चाहत्यांना दिले आग्रहाचे निमंत्रण

Neil Nitin Mukesh Grandfather : गायकाच्या फॅन्सना त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

Pooja Dange

Legendary Singer Mukesh 100th Birth Anniversary Celebration : दिग्गज गायक मुकेश यांची आज १०० वी जयंती आहे. मुकेश यांचे कुटुंबीय आज दक्षिण मुंबईतील मुकेश चौकात आज त्यांची जयंती साजरी करणार आहेत. प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या फॅन्सना त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

मुकेश यांचा नातू नील नितीन मुकेश आजोबांच्या १०० व्य जयंतीविषयी बोलताना म्हणाला, ' माझे कुटुंब आणि मी माझ्या आजोबांची १०० वी जयंती साजरी मुकेशजी आणि आमच्या कुटुंबाबाला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. (Latest Entertainment News)

त्यांचा वारस होण्याचा विशेषाधिकार मिळणे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे आणि त्यांच्याप्रमाणे आम्हीही आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे त्याच्याप्रमाणेच मनोरंजन करू शकू अशी आशा व्यक्त करतो. आमच्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ?'

मुकेश चांद माथूर, म्हणजे मुकेश. आई-वडिलांच्या १० अपत्यांपैकी मुकेश हे ६ वे अपत्य होते. लहानपानपासूनच त्यांच्या गायनाची आवड होती. सुप्रसिद्ध अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांना त्यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात गाताना पहिले आणि त्यांची प्रतिभा ओळखली.

मोतीलाल यांनी १७ वर्षाच्या मुकेशला मुंबईत आणले आणि त्यांची संगीत दिग्दर्शकांशी ओळख करून दिली. १९४५ मध्ये आलेल्या 'पहिली नजर' चित्रपटातील दिल जलता है तो जलने दे, हे मुकेश यांचे पहिले सुपरहिट गाणे ठरले

१९४७ साली आलेल्या आग चित्रपटातील भारतातील सर्वात मोठे शोमॅन राज कपूर यांच्यासाठी त्यांनी 'जिंदा हू इस तरह के' हे गाणे गायले. हे सुपरहिट गाणे होते. सजन रे झूट मत बोलो, रुक जा वो जानेवाली, यावर हूं, मेरा जुता है जपानी अशी बरीच हिट गाणी त्यांनी गायली आहेत.

३५ वर्षांच्या गाणाच्या कारकिर्दीत मुकेश यांनी १२ भाषांमध्ये १०५४ गाणी गायली आहेत. त्यापैंकी ५३१ हिंदी गाणी आहेत. तसेच मुकेश यांनी दिग्गज लता मंगेशकर यांच्यासोबत अनेक डुएट गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT