मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. केके यांच्या अचानक जाण्याने त्याचे चाहते आणि सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकातामध्ये एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. कॉन्सर्टनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
हे देखील पाहा -
केके हे बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आणि प्रसिद्धी मिळवली. मात्र त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवले. केकेने त्याच्या बालपणीच्या मैत्रणीशी लग्न केलं. त्यांच्या पत्नीचे नाव ज्योती आहे. ज्योतीसोबत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
केके आणि ज्योतीची प्रेमकहाणी कशी सुरू झाली?
केके यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, केके हे बालपणी ज्योती यांच्या प्रेमात पडले होते. ज्योतीसोबत त्यांची पहिली भेट सहाव्या वर्गात झाली होती. तेथून ते आतापर्यंत एकत्र होते. मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच मुलीला डेट केले आहे आणि ती म्हणजे माझी पत्नी ज्योती. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
केके आणि ज्योती लहानपणापासून एकत्र होते. दोघांनी 1991 मध्ये लग्न केले. त्यांना ज्योती यांच्यासोबत लग्न करायचं होतं पण त्यावेळी केके हे बेरोजगार होते. मुळे ज्योती यांच्यासोबत लग्न करण्यासाठी केके यांनी सेल्समनची नोकरी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. ही नोकरी केके यांनी ६ महिने केली. 1991 केके यांचा पल हा पहिला अल्बम प्रदर्शित झाला.
यानंतर केके यांनी स्वतःसाठी एक कीबोर्ड विकत घेतला आणि शिबानी कश्यप आणि सैबल बसू या मित्रांसोबत जिंगल्स बनवायला सुरुवात केली. तिघांनी मिळून या कामातून पैसेही कमावले, पण केके यांना त्यात काही विशेष आनंद नव्हता. ज्या गोष्टीची त्यांच्या आयुष्यात उणीव होती ती दिल्लीत नव्हती. त्यामुळेच तो मुंबईत आला होता. त्यांतर केके यांनी 'तडप तडप के इस दिल से आह निकलती राही' या गाण्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.