अंबरनाथमध्ये विकास कामांचा धडाका; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

विकासकामांच्या या धडाक्यामुळे ठाणे जिल्ह्यात विकासाचा नवा 'अंबरनाथ पॅटर्न' पाहायला मिळत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

अंबरनाथ - शहरात विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याचा जम्बो कार्यक्रम पार पडला. यामध्ये ४ कामांचं लोकार्पण, तर तब्बल १६ विकासकामांचं भूमिपूजन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आलं. विकासकामांच्या या धडाक्यामुळे ठाणे (Thane) जिल्ह्यात विकासाचा नवा 'अंबरनाथ पॅटर्न' पाहायला मिळत आहे.

हे देखील पाहा -

अंबरनाथ शहरात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. यामध्ये सर्कस ग्राउंडवर तब्बल २२ कोटी रुपये खर्चून नाट्यगृहाची उभारणी, नेताजी मार्केटमध्ये साडेनऊ कोटी रुपये खर्चून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी, खुंटवली बहुभाषिक शाळेच्या बाजूला सव्वातीन कोटी रुपये खर्चून बहुउद्देशीय सभागृह उभारणी, शासकीय विश्रामगृह उभारणी या शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं.

तसंच एमएमआरडीए आणि विशेष रस्ते अनुदानातून आलेल्या ५४ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील १० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं. अंबरनाथ पश्चिमेला उभारण्यात आलेल्या नवीन अग्निशमन केंद्र, लोकनगरी बायपास रस्ता, यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. अंबरनाथ शहरातील लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेल्या प्रकल्पांची एकूण किंमत तब्बल ११२ कोटी रुपयांच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंबरनाथ शहराचा विकास होत असल्याने विकासाचा हा नवीन 'अंबरनाथ पॅटर्न' यानिमित्तानं पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde
Gondia: दीड महिन्यांच्या बाळाने आरोग्य केंद्राच्या दारातच सोडले प्राण; पालकांचा आक्रोश

या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे देखील उपस्थित होते. तर अंबरनाथ शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com