Kartiki Gaikwad Blessed With Baby Boy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड झाली आई; सोशल मीडियावर शेअर केली गूड न्यूज

Kartiki Gaikwad Blessed With Baby Boy: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम गायिका कार्तिकी गायकवाडच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. कार्तिक गायकवाड आणि रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम गायिका कार्तिकी गायकवाडच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. कार्तिक गायकवाड आणि रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. कार्तिकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कार्तिकीने सोशल मीडियावर बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने छान कॅप्शन दिले आहे. माझ्या हातात कोणतीही गोष्ट परफेक्ट फिट झाली नव्हती किंवा शोभली नव्हती. जितकं माझ्या नवीन बाळाचा हात पकडला आहे, असं तिने म्हटलं आहे.

कार्तिकीने सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्यात बाळाचे पाय दिसत आहेत. त्यावर तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, आम्हाला नवीन खजिना मिळाला आहे. नव्याने प्रेम मिळाले आहे. मी आमचं बाळ किती छान आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. कार्तिकीच्या या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

कार्तिकीने मार्च महिन्यात आई होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांनी दिली होती. तिच्या ओटीभरणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कार्तिकीचे ओटीभरण अगदी थाटामाटात पार पडले होते. कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी, त्यावर फ्लॉवर ज्वेलरी असा सुंदर लूक केला होता.

कार्तिकी गायकवाडच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कार्तिकीनला 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून खरी ओळख मिळाली. कार्तिकीची गाणी प्रेक्षकांना खूप जास्त आवडतात. कार्तिकीने 'सारेगमप' या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिकादेखील बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT