Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Madhuri Dixit Affairs With These Actors : आज अभिनेत्री माधुरी दीक्षित ५७ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. अभिनेत्रीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईमध्ये झाला.
Madhuri Dixit
Madhuri DixitInstagram / @madhuridixitnene
Published On

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितची जगभरात ओळख आहे. माधुरी दीक्षित एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक फेमस डान्सर आणि निर्मातीही आहे. माधुरी दीक्षितची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. तिच्या सौंदर्याची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होते. आज अभिनेत्री फॅमिलीसोबत ५७ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. अभिनेत्रीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईमध्ये झाला. जाणून घेऊया, अभिनेत्रीच्या लव्हलाईफबद्दल...

Madhuri Dixit
Shamita Shetty : शमिता शेट्टी गंभीर आजाराशी देतेय झुंज, हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडीओ

माधुरी दीक्षितने आपल्या सिनेकरियरची सुरूवात १९८४ मध्ये रिलीज झालेल्या 'अबोध' चित्रपटातून झाली होती. या चित्रपटानंतर माधुरीने अनेक चित्रपट केले. पण अभिनेत्री खरी प्रसिद्धीझोतात १९८८ मध्ये रिलीज झालेल्या 'दयावान' चित्रपटातूनच आली. या चित्रपटात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत विनोद खन्ना होते. या चित्रपटामुळे माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्यानंतर १९८९ मध्ये माधुरी 'तेजाब'मध्ये दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटामध्ये अनिल कपूरही दिसले होते. चित्रपटातील 'एक दो तीन' गाण्यामुळे अभिनेत्रीला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक दर्जेदार आणि हिट चित्रपट बॉलिवूडला दिलेले आहेत.

अभिनेता अनिल कपूरसोबत माधुरीने 'बेटा', 'राम लखन', 'परिंदा', 'तेजाब' आणि 'किशन कन्हैया' सारख्या हिट चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. २०१९ मध्ये, माधुरीने आणि अनिल कपूरसोबत 'टोटल धमाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. ९० च्या दशकात माधुरीचे नाव अभिनेता संजय दत्तसोबतही जोडले जात होते.

'साजन', 'खलनायक' आणि 'ठाणेदार' या तीन चित्रपटांतहे प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर माधुरी आणि संजय २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'कलंक' चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारली होती. पण कायमच यांच्या रिलेशनच्या चर्चाच राहिल्या.

१९९९ मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. लग्नानंतर माधुरी फारशी चित्रपटांत दिसली नाही. २००७ मध्ये तिचा 'आजा नचले' हा चित्रपट आला होता. या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. माधुरीने अनेक टेलिव्हिजन डान्स शोचे जज म्हणून काम पाहिले आहे.

Madhuri Dixit
Salman Khan : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला माफ करायला बिश्नोई समाज तयार, पण समोर ठेवली मोठी अट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com