bappi lahiri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bappi Lahiri: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचे निधन

मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Shivani Tichkule

मुंबई - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले. त्यांनी आज मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

2020 मध्ये बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांची मुलगी असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी संगीत जगतातील सर्वात सुंदर तारा म्हटल्या जाणार्‍या लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला आणि आता बप्पी लाहिरीबद्दल येणारी ही बातमी इंडस्ट्रीसाठी धक्का आहे. बप्पी लाहिरी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बप्पी लाहिरी, ज्यांना बप्पी दा या नावाने ओळखले जाते, त्यांनी संगीत उद्योगात आपल्या सूर आणि गाण्यांनी एक वेगळ्या प्रकारचा राग निर्माण केला. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये गाणी दिली. त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

SCROLL FOR NEXT