Sikandar OTT Release  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar OTT Release : सलमान-रश्मिकाचा 'सिकंदर' OTTवर येतोय, कुठे अन् कधी पाहणार? वाचा अपडेट

Sikandar OTT Release Update : भाईजानचा 'सिकंदर' चित्रपट आता लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूडचा भाईजान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सिकंदर' रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. तरी चित्रपटाने बजेट वसूल केले नाही आहे. 'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. थिएटरनंतर आता 'सिकंदर' ओटीटीवर पाहता येणार आहे. 'सिकंदर' (Sikandar OTT Release) चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

'सिकंदर' ओटीटी रिलीज

सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' 30 मार्चला रिलीज झाला. या चित्रपटाने ईदच्या दिवशी बंपर कमाई केली आहे. थिएटरनंतर आता 'सिकंदर' घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. 'सिकंदर'चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल 85 कोटींना नेटफ्लिक्सने राइट्स खरेदी केले आहेत.

'सिकंदर' दोन ते तीन महिन्यात ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भाईजानचा 'सिकंदर' चित्रपट 11 ते 25 मे दरम्यान नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप कोणतीही ओटीटी रिलीज डेट निश्चित झालेली नाही.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सिकंदर'ने अद्यापही कोटींचा टप्पा पार करू शकला नाही आहे. 'सिकंदर' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर'ने पहिल्या दिवशी 26 कोटी, तर दसऱ्या दिवशी ईदला तब्बल 29 कोटींची कमाई केली. आज चित्रपटाला रिलीज होऊन सात दिवस पूर्ण झाले आहेत. सात दिवसांत चित्रपटाने 97.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

'सिकंदर' स्टारकास्ट

'सिकंदर' चित्रपटातून सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna ) ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यांची चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. सलमान आणि रश्मिकासोबत चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT