Sikandar CBFC Certificate 
मनोरंजन बातम्या

Sikandar CBFC Certificate: अरं देवा! 'सिकंदर'वर सेन्सॉर बोर्डाची कारवाई, अनेक सीनची छाटणी

Sikandar: सलमान खान, रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल यांच्या 'सिकंदर' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेय. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही मंडळाने हिरवी झेंडी दिली. पण सेन्सॉर बोर्डाने एआर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात दोन मोठे बदल केलेत.

Bharat Jadhav

सलमान खानचा चित्रपट 'सिकंदर' ट्रेलर आणि चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) एकाच दिवशी ने पास केलाय. नुकताच हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आला होता. यासह निर्मात्यांनी आज चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला. आजच सिकंदरच्या निर्मात्यांसाठी सेन्सॉर बोर्डाकडून दुहेरी आनंदाची बातमी आली. पण सेन्सॉर बोर्डाने सलमान खानच्या चित्रपटावर कात्री चालवलीय.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडनुसार, सेन्सॉर बोर्डाने पास केलेला चित्रपटाचा थिएटर ट्रेलर 3 मिनिटे 38 सेकंदांचा आहे. तर सलमानचा हा चित्रपट 2 तास 30 मिनिटे 8 सेकंदांचा असणार आहे. चित्रपट आणि ट्रेलरला US 13+ रेटिंग सेन्सॉर बोर्डने दिली असून त्याबाबतचं प्रमाणपत्र दिलंय. म्हणजेच 13 वर्षांवरील मुले पालकांच्या देखरेखीखाली या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट या दोन्हींना एकाच वेळी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्याचे क्वचितच घडते.

चित्रपटात बदल केला

सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. मात्र त्यात दोन बदलही केलेत. सिकंदरमध्ये होम मिनिस्टरचे पात्र आहे, मात्र भूमिकेला चित्रपटात होम मिनिस्टर ऐवजी फक्त मिनिस्टर म्हटलंय. यासह चित्रपटात एका राजकीय पार्टीच्या होर्डिगला ब्लर करण्यात आले आहे. कारण राजकीय पार्टीचं होर्डिंग हे एका राजकीय पार्टीशी मिळतंजुळतं होतं.

सिकंदर चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत होते. मात्र सिकंदरचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट नियोजित वेळेवर झालाय. सिकंदर टायगर 3 प्रमाणेच रविवारी रिलीज होतोय. हा चित्रपट 30 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT