Sikander Trailer Release: Guys, भाईजानच्या चित्रपटाचा ट्रेलर आला! पॉवरफूल आहे 'सिकंदर'

Salman khan Sikander Trailer: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिकंदरचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. भाईजानने त्याच्या चाहत्यांना ईदची भेट दिली आहे. हा चित्रपट 30 मार्चला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Salman khan
Salman khan Sikander Trailersaam tv
Published On

सलमान खानचे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिकंदरचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. भाईजान सलमानने त्याच्या चाहत्यांना ईदची भेट दिलीय. अभिनेत्याचा हा चित्रपट 30 मार्चला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. याआधी चित्रपटाचा टीझर आणि तीन गाणी आली आहेत. आता त्याचा शानदार ट्रेलर रिलीज झाला आहे. धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते चित्रपट पाहण्यास उत्सुक झालेत. सलमान खानच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे.

कसा आहे सिकंदरचा ट्रेलर?

सिकंदरच्या ट्रेलर धमाकेदार असून या चित्रपटातून सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानाचा सिकंदरवाला स्वॅग दिसणार आहे. रश्मिकासोबतची त्याची बॉन्डिंगही उत्तम आहे. तरुण अभिनेत्रीसोबत काम केल्याबद्दल सलमानला ट्रोल केलं जातंय. पण चित्रपटात रश्मिकासोबतची त्याची केमिस्ट्री भारी जमलीय. यामुळे चाहत्यांना ही जोडी नक्कीच आवडेल, असं ट्रेलरवरून दिसत आहे.

Salman khan
Rashmika Mandanna : 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला रश्मिका मंदाना पडता पडता वाचली, पाहा व्हायरल VIDEO

हा ॲक्शनपट असला तरी या चित्रपटातील भाईजानची स्टाइल चाहत्यांना आवडते. ट्रेलरमध्ये दिसणारे इतर कलाकारही त्यांच्या भूमिकेत फिट दिसताहेत. चित्रपटातील रश्मिकाची भूमिका मात्र रहस्यमय दिसते. ट्रेलरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात कथा समोर आलेली नाहीये, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

 चित्रपटाचा थिएटर ट्रेलर 3 मिनिटे 38 सेकंदांचा आहे. तर हा चित्रपटाचा एकूण वेळ 2 तास 30 मिनिटे 8 सेकंदांचा असणार आहे. चित्रपट आणि ट्रेलरला US 13+ रेटिंग सेन्सॉर बोर्डने दिली आहे. याचा अर्थ म्हणजेच 13 वर्षांवरील मुले पालकांच्या देखरेखीखाली या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. एकाच वेळी सेन्सॉर बोर्डाकडून ट्रेलर आणि चित्रपटाला प्रमाणपत्र मिळालंय.

Salman khan
Sikandar CBFC Certificate: अरं देवा! 'सिकंदर'वर सेन्सॉर बोर्डाची कारवाई, अनेक सीनची छाटणी

सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटातील काही सीन आणि संवादात काही बदल करण्यात आली आहेत. सिकंदरमध्ये होम मिनिस्टर असा उल्लेख एका संवादात होता तो हटवण्यात आलाय. यासह चित्रपटातील राजकीय पार्टीची होर्डिग ब्लर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com