Alicia Kaur And Siddharth Malhotra Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra Cozy Video : सिद्धार्थ मल्होत्रासोबत मॉडेल झाली कोझी, व्हिडीओ व्हायरल होताच कियाराची मागितली माफी!

Sidharth Malhotra With Model Viral Video : शुक्रवारी झालेल्या शांतनु आणि निखिलच्या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने मॉडेल अलीसिया कौरसोबत रॅम्पवॉक केलेला आहे. सध्या अभिनेता ह्या रॅम्प वॉकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडच्या फेमस कपलमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीची गणना केली जाते. सध्या ह्या कपलची सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान चर्चेत आली आहे. शुक्रवारी झालेल्या शांतनु आणि निखिलच्या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने मॉडेल अलीसिया कौरसोबत रॅम्पवॉक केलेला आहे. सध्या अभिनेता ह्या रॅम्प वॉकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. ह्या रॅम्पवॉकचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओतील दोघांच्याही कोझी मुव्हमेंटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्यांचा रॅम्पवॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या मॉडेलने कियारा आडवाणीची माफी मागितली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या लूक आणि स्टाईलमुळे कायमच चर्चेत राहतो. त्याचा चाहतावर्ग फक्त देशातच नाही तर परदेशातही आहे. दिल्लीमध्ये झालेल्या फॅशन इव्हेंटमध्ये सिद्धार्थ आणि अलीसियाने रॅम्पवॉक केला आहे. या रॅम्पवॉकचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत सिद्धार्थची कॉलर पकडून ती मॉडेल खूप क्लोज जाऊन पोजेस देताना दिसत आहे. शिवाय ती त्याच्या चेहऱ्यालाही स्पर्श करताना दिसत आहे, तर कधी त्याचा कोट खेचून त्याच्या जवळ जात आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अलिसीयाने कियाराची माफी मागितलीये.

Alicia Kaur Insta Story

मॉडेलने इन्स्टा स्टोरीवर रॅम्पवॉकचा व्हिडिओ शेअर करत कियाराची माफी मागितली. "सॉरी कियारा" असं लिहित तिने इन्स्टा स्टोरी शेअर केली. त्यानंतर "हे आमचे काम आहे." असं कॅप्शन देत मॉडेलने आणखी एक स्टोरी शेअर केलेली आहे. या दोन्ही इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेत्रीने सिद्धार्थ मल्होत्राला टॅग केलं आहे. या रॅम्पवॉक वेळी सिद्धार्थने फॅन्सी आणि स्टायलिश ब्लॅक सूट परिधान केला होता. तर त्या मॉडेलने फॅन्सी वेस्टर्न ड्रेस कॅरी केलेला होता.

Alicia Kaur Insta Story

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

SCROLL FOR NEXT