Sidharth Malhotra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Malhotra: तेव्हा सिद्धार्थ काय करत होता? जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टी

सिद्धार्थ हा उत्कृष्ट अभिनयासोबतच काही खासगी आयुष्यातील गोष्टींमुळेही चर्चेत आहे.

Chetan Bodke

Siddharth Malhotra: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा ​​आज अर्थात 16 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिद्धार्थ हा उत्कृष्ट अभिनयासोबतच काही खासगी आयुष्यातील गोष्टींमुळेही चर्चेत आहे.

आज आपल्या मेहनतीमुळे आणि कर्तृत्वामुळे सिद्धार्थ त्याच्या करिअरच्या शीर्षस्थानी आहे, परंतु चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सिद्धार्थ कोणते काम करायचा हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यातील काही न ऐकलेले किस्से जाणून घेऊया.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​मूळचा दिल्लीचा. त्याने दिल्लीतूनच शिक्षण घेतले आहे. 12वीनंतर सिद्धार्थने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगत सिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पुर्ण केले आणि त्यानंतर त्याने मॉडेलिंग विश्वात पदार्पण केले. खरं तर, सुरुवातीला सिद्धार्थने त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी मॉडेलिंग सुरू केले आणि बराच काळ मॉडेल म्हणूनच काम केले.

सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या असून सोबतच आपल्या अभिनयामुळे स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. परंतु सिद्धार्थने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी बॉलिवूडमध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की 2010 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी शाहरुखच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटात करण जोहरसोबत सहदिग्दर्शक म्हणून काम केले होते.

सिद्धार्थने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात करताच त्या क्षेत्रात यश संपादन केले. पण सिद्धार्थला अभिनयात करिअर करायचे होते. त्यामुळे सिद्धार्थने मॉडेलिंग सोडले. अभिनयातील कारकिर्दीत सिद्धार्थने अनुभव सिन्हाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, पण तो चित्रपट सत्यात उतरलाच नाही. मधुर भांडारकरने 2008 च्या फॅशन चित्रपटात सिद्धार्थला प्रियंका चोप्राच्या विरुद्ध मुख्य भूमिकेची ऑफर दिली, तथापि, मॉडेलिंगमुळे त्याने हा चित्रपट केला नव्हता.

जेव्हा सिद्धार्थ 'माय नेम इज खान'साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्याला अभिनयातच करियर करायचे होते. त्याच दरम्यान जेव्हा धर्मा प्रोडक्शन 'स्टुडंट ऑफ द इयर'या चित्रपटाची तयारी करत होते तेव्हा, सिद्धार्थला ऑडिशन देण्याचा सल्ला दिला होता. धर्मा प्रोडक्शनला या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्यांची गरज होती. सिद्धार्थने ऑडिशन दिले आणि त्याची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

Maharashtra News Live Updates: ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडणार; मातोश्रीतील बैठकीत ठाकरे गटाचा निर्धार

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT