Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Manoj Jarange patil vs Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

बीड : विधानसभा निवडणुकीत भरघोष यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे आज बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहे. काही दिवसांनी मंत्रिमंडळ स्थापन होईल. अनेक मराठा आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं. विधानभवनात मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडावेत. मुख्यमंत्री कोणीही झाले, तरी मला फरक पडणार नाही. मी माझ्या समाजासाठी उपोषणावर ठाम आहे'.

Manoj Jarange Patil
Aheri Election result 2024 : अहेरीत बाप विरूद्ध मुलगी लढत, धर्मरावबाबा अत्राम यांनी केला मुलीचा पराभव
Manoj Jarange Patil
Pune Election Results: पुणे जिल्ह्यातून ४ नव्या आमदारांचे चेहरे; 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. ' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तरीही मला फरक पडणार नाही. कारण या अगोदरही ते सरकारमध्ये होते. त्यांनी काय केलं? कसं केलं आणि काय करायचं, कसं करायचं? हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आम्ही कुणाला घाबरणारे मराठे नाहीत. मराठा बांधवांनी दुसरीकडे कुठेही उपोषण न करता फक्त अंतरवली सराटीमध्येच उपोषण होणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.

Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Result: लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं खरं, पण विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली

'मी काही दिवसात याची तारीख सांगणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत थांबा, यामध्ये कोण मुख्यमंत्री होते? कुणाला कोणते मंत्रिपदे मिळतात? मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या मराठा समाजासाठी उपोषणावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com