Aflatoon Marathi Comedy Movie Teaser Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Aflatoon Teaser Out : सिद्धार्थ जाधव - जॉनी लिव्हरच्या कॉमेडीचा डबल डोस ; अफलातून टीजर प्रदर्शित

Pooja Dange

Aflatoon Marathi Comedy Movie Teaser Released : सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, विजय पाटकर, तेजस्विनी लोणारी अशी दमदार कास्ट असलेल्या नाव्ह्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. अफलातून असे या चित्रपटच नाव असून २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, विजय पाटकर म्हणजे कॉमेडीचा तडका नक्की पाहायला मिळणार आहे. तर सिद्धार्थच्या सोबत स्वतः पारितोष पेंटर देखील अभिनय करत आहेत. तीन मित्रांच्या हा सिनेमा नक्कीच तुम्हाला पॉट धरून हसायला लावेल. (Latest Entertainment News)

अफलातून चित्रपटाच्या टीजरची सुरुवात सिद्धार्थ जाधव, जयेश ठक्कर आणि पारितोष पेंटरपासून होते. सगळीकडे धडपडणाऱ्या श्री (सिद्धार्थ जाधव)च्या पात्राची ओळख करून दिली आहेत. त्यानंतर चित्रपटातील मुख्य कलाकार जयेश (मानव), पारितोष पेन्टल (आदी) याची ओळख होते.

अफलातूनमधील श्री आंधळा, आदी बहिरा आणि मानव मुका आहे. या तिघांच्या जीवनात काहीतरी ट्रॅडीजी होते आणि त्यांच्या मागे पोलीस लागतात. या चित्रपटामध्ये तेजस्विनी लोणारी आणि विजय पाटकर पोलिसांच्या भूमिकेत आहेत. तर जॉनी लिव्हर, रेशमी टिपणीस, श्वात गुलाटी आपल्या समोर येतात.

सिद्धार्थ, जयेश आणि पारितोष यांच्या कोमेंदूची झलक टीजरमधून पाहायला मिळते. त्याचे कॉमेडी टायमिंग उत्तमच आहे. तिघांचा अभिनय आणि केमिस्ट्री बघताना चित्रपट बघायला नक्की मजा येईल टीजर इतका भारी आहे तर ट्रेलर आणि चित्रपट दमदार असणार यात शंकाच नाही.

कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर या बाप-लेकाची जोडी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे.

‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत.ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT