Hbd Siddharth Jadhav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hbd Siddharth Jadhav: रेल्वेस्टेशनवर गर्दीत प्रपोज, पण नकार मिळाला; ५ वर्षानंतर फुलले प्रेम, सिद्धार्थ आणि तृप्तीची हटके लव्हस्टोरी!

Siddharth Jadhav and Trupti Jadhav Lovestory: अभिनय कारकिर्दसह सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये असतो. सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातील हास्यसम्राट म्हणजेच आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिद्धार्थ जाधव आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थने सिनेसृष्टीत स्वत:ची अनोखी छाप उमटवली आहे. अभिनय कारकिर्दसह सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये असतो. अशातच सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.

सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे. लहानाचा मोठा सिद्धार्थ जाधव मुंबईमध्ये झाला. सिद्धार्थने रूपारेल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच नाटकांची आवड असल्याने छोट्यामोठ्या भूमिका तो करायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'रामभरोसे' या नाटकासाठी सिद्धार्थ जाधव दिग्दर्शक म्हणून काम करत होता. यावेळी ऑडिशन सुरू असताना तृप्ती देखील ऑडिशनला आली होती. त्याचवेळी तृप्तीही नाटके करायची. पत्रकारिता शिक्षण घेण्यासोबत तृप्तीला नाटक करण्याची आवड निर्माण झाली होती.

सिद्धार्थ आणि तृप्ती 'रामभरोसे'च्या ऑडिशनला एकत्र भेटले होते. पहिल्यांदा भेटल्यानंतर तृप्तीविषयी सिद्धार्थला प्रेम निर्माण झाले. दरम्यान सिद्धार्थने तिला अभिनयाबद्दल देखील विचारले होते. मात्र तीने नकार दिला होता. ऑडिशन झाल्यानंतर आता तृप्तीची भेट काही होणार नाही. यानिमित्ताने सिद्धार्थने तिला प्रपोज करण्याचे ठरवले. सुरूवातीला दोघेही एलफिन्स्टन स्टेशनला उतरायचे. दरम्यान दोन तीन दिवसांनी सिद्धार्थने तृप्तीला रेल्वेस्टेशनवर गर्दीत प्रपोज केला. तृप्तीने सिद्धार्थला नकार दिला. तरीही सिद्धार्थने तृप्तीला मैत्रीचे नाते म्हणून एकमेकांशी बोलूया असं सांगितलं.

सतत फोनवर गप्पा, भेटणं वाढल्याने पुढे या दोघांची मैत्री घट्ट झाली. सिद्धार्थ अनेकदा तृप्तीला म्हणायचा जेव्हा तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझ्या विचार कर. पण तृप्तीला त्याच्याबद्दल काहीही रस नव्हता. त्यावेळी तृप्ती कोणाबरोबर बोलली किंवा तिला कोणाचा फोन आला तरी सिद्धार्थला राग यायचा. यामुळे तिने त्याच्या न बोलण्याचा निर्णय घेतला सिद्धार्थला देखील हे माहित होते. दरम्यान,यावेळी दोघेही साधारण २० ते २२ वर्षांचे होते. सिद्धार्थ त्यावेळी फार धडपड करत होता. तो मिळेल त्या छोट्या मोठ्या भूमिका करायचा.

काही दिवसांनी तृप्तीला सिद्धार्थबाबत आकर्षण निर्माण झाले. आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवले. त्यानंतर तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि तब्बल ४ ते ५ वर्षांनी तिने सिद्धार्थला होकार दिला.सिद्धार्थ आणि तृप्ती हे रोज स्टेशनवर भेटायचे. तो तिला नेहमी चॉकलेट गीफ्ट्स द्यायचा. ५ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १० मे २००७ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ आणि तृप्तीला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT