Shweta Tiwari And Karan Johar Upcoming Project Shweta Tiwari | Instagram@Shweta Tiwari
मनोरंजन बातम्या

Shweta Tiwari New Movie : 'संस्कारी बहू'ला मिळाला मोठा ब्रेक, केव्हाही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार श्वेता तिवारी

Shweta Tiwari And Karan Johar Upcoming Project : टिव्हीच्या दुनियेतील संस्कारी बहू आता श्वेता तिवारी आता दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कसा असेल तिचा हा अवतार पाहूया

Shweta Joshi

अभिनेत्री श्वेता तलवारीला म्हणजेच 'कसोटी जिंदगी की' या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेने घराघरात पोहोचवलं. सध्या श्वेता तिवारी तिच्या हॉट फोटो शुटमुळे चांगलीच चर्चेत असते. तिची पर्सनल आणि प्रोफोशन लाईफ कायमच वादग्रस्त राहिली आहे. ४३ वर्षांची श्वेता तिच्या अफलातून फिटनेसमुळे सर्वांचेचं लक्ष वेधून घेत असते. आता श्वेता एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता बातमी येत आहे की, श्वेता लवकरच करण जोहर सोबत काम करेल. धर्मा प्रोडक्शनच्या आगामी वेबसीरिजमध्ये श्वेता डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यात सुंदर साडीमध्ये श्वेता, सिगरेटचे झुरके ओढताना पाहायला मिळेल. श्वेतासाठी हा रोल अतिशय चॅलेंजिग असल्याचं तिने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे.

या इंटरव्ह्यूमध्ये श्वेताने सांगितलं की, तिला आयुष्यात नवी सुरुवात करायची आहे. यासाठी ती लहान-सहान रोल करायलाही तयार आहे. आतापर्यत श्वेताने अनेक टिव्ही सिरिअलमध्ये काम केल आहे. मात्र आता तिला आऊट ऑफ द बॉक्स काही करायची इच्छा आहे.

या आधी श्वेता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्येही दिसली होती. याशिवाय 'सिंघम अगेन' सिनेमात अजय देवगणसोबत दिसेल. टिव्ही सिरिअल सोबतच श्वेताने या आधीही अनेक सिनेमांमधून आपलं नशीब आजमावलं आहे. मात्र तिच्यासाठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. अनेक वेळा भेदभावचा सामना तिला करावा लागला. एकदा एका दिग्दर्शकाने 'तू सिनेमांमध्ये काम करण्याच्या लायकी नाही' असं सुनावलं होतं.

आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत, मग ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा काम असही श्वेताने सांगितलं. प्रोजेक्ट चांगला असेल तर मी पैश्यांची परवा करत नसल्याचं ही श्वेता ने म्हणल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT