Shweta Tiwari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Shweta Tiwari: श्वेता तिवारीने महिलांविरोधातील ऑनलाइन गैरवर्तनाच्या प्रकरणावर पोस्ट करत राज ठाकरेंचे आभार मानले. मनसेकडून प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यक्तींचा माफीनामा पाठवण्यात आल्याचे तिने सांगितले

Shruti Vilas Kadam

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावरील पोस्ट आणि रिल्समुळे अनेकदा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने तुकाराम मुंढे यांच्याबाबत केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर महिलांविरोधात आक्षेपार्ह कमेंट आणि ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये मनसे समर्थकांचाही समावेश असल्याचा आरोप करत तिने सोशल मीडिया राज ठाकरेंना सवाल केला होता. या पोस्टनंतर मनसे नेत्या स्नेहल अडारकर यांनीही श्वेता तिवारीला उत्तर दिले होते. आता याच प्रकरणावरून श्वेता तिवारीने राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

श्वेता तिवारीने नेमकं काय म्हटलं?

श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. काही दिवसांपूर्वी काही व्यक्ती महिलांबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले होते. यानंतर तिने संबंधित व्यक्तींच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. अशा प्रकारचे ऑनलाइन गैरवर्तन करणाऱ्यांना कोणतीही कारवाई होणार नाही आणि आपण यातून सहज सुटू शकतो, असे त्या नेटकऱ्यांना वाटू नये, असे तिचे मत होते. याच पार्श्वभूमीवर तिने राज ठाकरे यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला होता की, मनसेचे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींचे असे वर्तन पक्षाला मान्य आहे का? यानंतर मनसे नेत्या स्नेहल अडारकर यांनी श्वेता तिवारीशी संपर्क साधला. महिलांविरोधातील अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे त्यांनी श्वेताला स्पष्ट केले.

Shweta Tiwari

तीन दिवसांत पाठवले माफीनामे

श्वेता तिवारीच्या म्हणण्यानुसार, स्नेहल अडारकर यांनी संबंधित व्यक्ती पक्षाचे सदस्य नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. यासाठी स्नेहल अडारकर यांनी श्वेताकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, अवघ्या तीन दिवसांतच संबंधित व्यक्तींचा फोन नंबर आणि त्यांच्या हस्ताक्षरातील माफीपत्र श्वेताला पाठवण्यात आले. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी भूमिका पक्षाची असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

‘राज ठाकरेजी, थँक्यू’

श्वेताने संबंधित व्यक्तींकडून पाठवण्यात आलेला माफीनामाही सोशल मीडियावर शेअर केला. ऑनलाइन गैरवर्तनाची समस्या ही केवळ एका व्यक्तीपुरती किंवा एका घटनेपुरती मर्यादित नसल्याचे तिने म्हटले. तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी ऑनलाइन गैरवर्तनावर प्रभावी तोडगा काढण्याची गरज असल्याचेही श्वेता म्हणाली. मात्र, या प्रकरणात मनसेकडून गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे सांगत तिने स्नेहल अडारकर यांचे कौतुक केले. शेवटी श्वेताने या प्रकरणाला गांभीर्याने घेतल्याबद्दल राज ठाकरे यांचेही आभार मानले. “राज ठाकरेजी, थँक्यू,” असे म्हणत तिने आपली पोस्ट संपवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा भीषण अपघात

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT