Shweta Bachchan Gets Annoyed With This Habit Of Aishwarya Rai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shweta Bachchan And Aishwarya Bachchan News : श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्या रायची कोणती गोष्ट खटकते?, खुद्द तिनेच केला खुलासा

Shweta Bachchan Gets Annoyed With This Habit Of Aishwarya Rai : करण जोहरच्या चॅट शोमध्ये श्वेता बच्चन हिने गेल्या काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. यावेळी मुलाखतीत श्वेताने ऐश्वर्याची कोणती सवय आवडते आणि कोणती नाही, याचा खुलासा केलेला आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची नणंद श्वेता बच्चन यांच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात. अशातच या दरम्यान सध्या सोशल मीडियावर या दोघींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चनने करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी श्वेता चॅट शोमध्ये ऐश्वर्या रायबद्दल मोकळेपणाने बोलली होती. मुलाखतीत श्वेताने ऐश्वर्याची कोणती सवय आवडते आणि कोणती नाही, याचा खुलासा केलेला आहे.

खूप काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चन या शोमध्ये आली होती. या दरम्यानचा व्हिडीओ सध्या रेडिट या सोशल मीडिया पेजवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करणने श्वेताला 'तुला ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडते कोणती नाही आणि तुला तिच्याविषयी कोणत्या गोष्टीची चीड येते?'

या प्रश्नावर श्वेताने उत्तर दिले की, "ऐश्वर्या एक सेल्फ मेड, सशक्त महिला आणि खूप चांगली आई आहे. मला तिच्यातील ही गोष्ट फार आवडते."

तर ऐश्वर्याच्या न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ऐश्वर्याने सांगितले की, "ती कधीच मेसेज आणि कॉलचं उत्तर देत नाही. आणि तिचं टाईम मॅनेजमेंट खूप सहन करावं लागतं." रेडिटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्वेताने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

श्वेता बच्चन नंदा बद्दल सांगायचे तर, अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली असे तिला दोन मुले आहेत. नव्या नवेली कायमच तिच्या पॉडकास्टमुळे कायमच चर्चेत असते. तर मुलगा अगस्त्यने 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अनेक बॉलिवूड स्टारकास्ट्स होते. श्वेता कायमच अगस्त्य आणि नव्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT