Gulaabi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gulaabi Movie: श्रृती मराठेच्या चित्रपटाची 'गुलाबी' हवा; रिलीज होण्याआधीच कोट्यावधी रूपये कमावले

Shruti Marathe Ashwini Bhave And Mrinal Kulkarni Gulabi Movie : गुलाबी चित्रपटाने प्रदर्शिक होण्याआधीच कोटींचा गल्ला जमावला आहे.

Manasvi Choudhary

मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

गुलाबी चित्रपटाची कथा ही फक्त मैत्रीची नसून, त्यांच्या वैयक्तिक संघर्षाची आणि आत्मसन्मानाच्या शोधाची गोष्ट आहे. या प्रवासात श्रृती मराठेसह अश्विनी भावे आणि मृणा कुलकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या तिघींच्या रंगमय प्रवास या चित्रपटातून होत आहे. जयपूरमधील विविध रंगाचे आणि सौंदर्याचे दर्शनही घडत आहे. तीन महिला जयपूरला पिकनीकला एकत्र भेटल्यावर त्यांचं भावविश्व कसं उलगडल जातं याची कहाणी आहे.

दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. ‘गुलाबी’ चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात ‘गुलाबी’ने आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’’

व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित 'गुलाबी' या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. यात चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अमोल भगत या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT