Shreyas Talpade Told Story of Pushpa Famous Dialogue Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade: स्क्रिप्टमध्ये नसलेला झुकेगा नहीं साला डायलॉग अचानक सिनेमात कसा आला? श्रेयसनेच सांगितलं गोडगुपित

Pushpa Famous Dialogue: चित्रपटाचा आयकॉनिक डायलॉग म्हणजे 'फूल नहीं, फायर है में' मूळ चित्रपटात नव्हता.

Saam Tv

Shreyas Talpade Told Story Behind Pushpa: पुष्पा चित्रपट आणि त्यातील डायलॉग यांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा: द राइज' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने अल्लू अर्जुनला एक नवीन ओळख दिली.

या चित्रपटाने 'पुष्पा झुकेगा नही' आणि 'फ्लॉवर नहीं, फायर है मैं' सारखे अनेक डायलॉग्स सोबतच 'ओ अंटावा' आणि 'श्रीवल्ली' सारख्या दमदार गाण्यांनाही दिले. या चित्रपटतात हे हिट डायलॉग मूळ तेलुगू चित्रपट नव्हते.

पुष्पा चित्रपटातील सर्व हिट डायलॉग चित्रपटाचे हिंदीत डबिंग करताना तयार झाले. 'पुष्पा: द राइज'च्या हिंदी व्हर्जनमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे. श्रेयसने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. डबिंग करताना मूळ संवादांवर बरीच सुधारणा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ चित्रपटात डबिंग करताना शाब्दिक भाषांतर केले जात नसल्याचा खुलासा श्रेयसने केला आहे. अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय डायलॉगचा शाब्दिक अनुवाद 'पुष्पा जायेगा नही' असा होता पण तो अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही तो 'पुष्पा झुकेगा नहीं' बनवला आणि मग हा डायलॉग किती लोकप्रिय झाला हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे.

श्रेयस तळपदेने सांगितले की, चित्रपटाचा आणखी एक आयकॉनिक डायलॉग म्हणजे 'फूल नहीं, फायर है में' मूळ चित्रपटात नव्हता. डबिंग करताना आम्ही बदल केले आणि वर्षभरानंतरही लोक हा डायलॉग बोलत आहेत. आमचा उद्देश हाच होता की शाब्दिक भाषांतर करण्याऐवजी पात्राचे सार टिकवून ठेवेल आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहील असेच भाषांतर करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT